Video : धैर्यशील मानेंच्या भाषणावेळी एका शिवसैनिकाची मास्कमुळे मोठी फजिती! निलेश राणेंचा जोरदार टोला
शिवसेना नेते आज उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करताना पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तर एकनाथ शिंदे यांनी मनसेवर टीकास्त्र डागलं. दरम्यान, या जाहीर सभेतील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. खासदार धैर्यशील माने भाषण करत असताना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शिवसैनिकांची मास्कमुळे मोठी फजिती झाल्याचं या व्हिडीओत पहायला मिळत आहे!
मुंबई : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. नेहमीपेक्षा शिवसेनेनं यंदा उत्तर प्रदेशात अधिक जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने (Dhairyashil Mane), खासदार प्रियंका चर्तुवेदी यांच्यासह अनेक शिवसेना नेते आज उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करताना पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर तर एकनाथ शिंदे यांनी मनसेवर टीकास्त्र डागलं. दरम्यान, या जाहीर सभेतील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. खासदार धैर्यशील माने भाषण करत असताना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शिवसैनिकांची मास्कमुळे मोठी फजिती झाल्याचं या व्हिडीओत पहायला मिळत आहे! हाच व्हिडीओ ट्वीट करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय.
खासदार धैर्यशील माने हे आपल्या जोरदार भाषणशैलीमुळे ओळखले जातात. असंच जोरदार भाषण ते उत्तर प्रदेशातील डुंबारियागंजमधील करत होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभा असलेल्या एका शिवसैनिकाला दिलेला मास्कच घालता येत नव्हता. हा शिवसेना पदाधिकारी जवळपास दोन मिनिटे तो मास्क घालण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला मास्कची रचनाच लक्षात येत नव्हती. त्यामुळे बराच काळ प्रयत्न करुनही मास्क नेमका कसा घालायचा हेच त्याच्या लक्षात येत नाही. शेवटी मास्क कसा घालायचा हे समोरील व्यक्तीकडून तो समजून घेतो आणि मास्क घालतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झालाय.
निलेश राणेंचा शिवसेनेला जोरदार टोला
दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मास्क घालता न येणाऱ्या शिवसैनिकाचा व्हिडीओ ट्वीट केलाय. ‘हे चींदीचोर मास्क घालू शकत नाही पण नशिबाने बसले सरकार चालवायला’, अशा शब्दात शिवसेनेला टोला लगावलाय.
हे चींदीचोर मास्क घालू शकत नाही पण नशिबाने बसले सरकार चालवायला. pic.twitter.com/UQB3JMsNS1
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 24, 2022
शिवसेना उत्तर प्रदेशात खातं उघडणार- आदित्य ठाकरे
दरम्यान, या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उत्तर प्रदेशात खातं उघडणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. ‘डिंबरियागंजमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. इथल्या तरुणांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आणि आक्रोश वाढत आहे. इथे शिवसेना आपलं खात उघडेल’ असं आदित्य ठाकरे म्हणाले. इतकंच नाही तर खासदार संजय राऊत यांनी यंदा शिवसेना उत्तर प्रदेशात 5 जागा जिंकेल असा दावा केलाय.
आज उत्तर प्रदेश में डुमरियागंज विधानसभा के प्रत्याशी शैलेंद्र उर्फ राजू श्रीवास्तव जी के समर्थन मे जनसभा को संबोधित किया। यहा श्रीवास्तव जी को आशीर्वाद देने आया हुआ जनसैलाब देखकर बदलाव की लहरे साफ़ दिखती है।@ShivSena @rautsanjay61 जी @priyankac19 जी @mpdhairyasheel जी pic.twitter.com/54LtaJuZM1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 24, 2022
इतर बातम्या :