Video : आमदार महोदयांची संगीत खुर्ची! भाजप आमदार विजय राहंगडाले यांचा संगीत खुर्चीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

आमदार विजय राहंगडाले इलमाकोट इथल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी तिथे संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला. त्यावेळी आमदार महोदयांनाही या खेळात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.

Video : आमदार महोदयांची संगीत खुर्ची! भाजप आमदार विजय राहंगडाले यांचा संगीत खुर्चीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजप आमदार विजय राहंगडाले यांचा संगीतखुर्ची खेळतानाचा व्हिडीओImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 2:58 PM

गोंदिया :  खुर्चीचा मोह सुटत नाही म्हणतात. राजकारणात (Politics) तर एकमेकांची खुर्ची खेचण्याची स्पर्धाच लागलेली असते. गोंदियाच्या तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय राहंगडाले (Vijay Rahangadale) यांनाही खुर्चीचा मोह आवरत नसल्याचं पाहायला मिळालं. पण ही खुर्ची राजकीय नाही तर संगीतखुर्चीच्या (Sangeet Khurchi) खेळातील आहे. आमदार विजय राहंगडाले इलमाकोट इथल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी तिथे संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला. त्यावेळी आमदार महोदयांनाही या खेळात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.

भाजप आमदार विजय राहंगडाले यांचा पदाधिकाऱ्यांसोबत संगीतखुर्ची खेळतानाचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. इलमाकोट येथे मुख्याध्यापक राजू चामट यांचा सेवानिवृत्तिचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात संगीतखुर्चीचाही समावेश होता. आता खुर्चीचा खेळ म्हटला तर आमदार महोदय मागे कसे राहणार? राहंगडाले हे देखील या खेळात सहभागी झाले. राजकारण खुर्ची महत्वाची मानली जाते आणि ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण घिरट्या घालत असतो आणि संधी साधत खुर्चीवर आरुढही होत असतो. असंच काहीसं राहंगडाले यांनी संगीतखुर्चीत दाखवुन दिलं.

हे सुद्धा वाचा

आमदार महोदयांनी मुत्सद्दीपुणे खुर्चीचा ताबा मिळवला

संगीतखुर्चीच्या खेळात गाणं सुरु झालं, आमदार महोदय आणि कार्यकर्ते खुर्चीभोवती फिरु लागले. दोन राऊंड पूर्ण झाल्यावर गाणं थांबलं आणि राहंगडाले यांनी अगदी मुत्सद्दीपणे खुर्चीचा ताबा मिळवला. त्यानंतर एक खुर्ची कमी करण्यात आली. पुन्हा गाणं वाजू लागलं, पुन्हा गोल राऊंड सुरु झाला. त्यावेळी राहंगडाले हे काहिसे संभ्रमित झाले. पण लगेच सावरत ते पुढे चालू लागले. पुन्हा एकदा गाणं वाजायचं थांबलं आणि आमदार महोदयांनी जवळजवळ उडी घेतच खुर्चीचा ताबा मिळवला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.