Special Report : तंबाखूचा विडा, मोबाईलमध्ये तीन पत्तीचा किडा, यूपी विधानसभेतल्या व्हिडीओवरुन राडा!

उत्तर प्रदेशचं पावसाळी अधिवेशन संपलंय. मात्र त्यादरम्यान व्हायरल झालेल्या या दोन व्हिडीओंचा वाद अधिवेशन संपल्यानंतरही सुरु आहे.

Special Report : तंबाखूचा विडा, मोबाईलमध्ये तीन पत्तीचा किडा, यूपी विधानसभेतल्या व्हिडीओवरुन राडा!
उत्तर प्रदेशच्या विधानसभेतल्या आमदारांचे व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 11:26 PM

अजय सोनावणे, टीव्ही9 मराठी: काही जण तंबाखू मळतंय आणि दुसरा मोबाईलवर तीन पत्तीचा गेम खेळतोय. तंबाखू हानिकारक असली, तरी कुणी खावं आणि कुणी खावू नये हा वैयक्तिक विषय आहे आणि जुगाराचा अड्डा चालवणं बेकायदेशीर असलं, तरी ऑनलाईन जुगारात कररुपी उत्पन्न मिळत असल्यामुळे त्याला मूभा आहे. मात्र जिथं तंबाखू (Tobacco) मळली जातेय आणि जिथं तीन पत्तीचा गेम (Teen Patti Game) रंगलाय. (Viral Video) ती ही जागा आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभा सभागृहाची. (UP Legislative Assembly) आणि हे कृत्य करणारे दोन्ही आमदार सत्ताधारी भाजपचे आहेत.

उत्तर प्रदेशचं पावसाळी अधिवेशन संपलंय. मात्र त्यादरम्यान व्हायरल झालेल्या या दोन व्हिडीओंचा वाद अधिवेशन संपल्यानंतरही सुरु आहे. तंबाखू मळणारे रवी शर्मा नावाचे आमदार झांशी विधानसभेतले आहेत.आणि तीन पत्तीचा गेम खेळणारे आमदार महोबा सदरमधून निवडून आलेले राकेश गोस्वामी आहेत.

हे सुद्धा वाचा

यातली रंजक गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी हे आमदार बसले आहेत. ती संपूर्ण सत्ताधारी म्हणजे भाजप आमदारांची बाकं आहेत.आणि ज्या अँगलनं हा व्हिडीओ शूट झालाय. त्यानुसार हे व्हिडीओ विरोधकांनी नव्हे तर कुठल्यातरी दुसऱ्या भाजप आमदारानंच बनवून व्हायरल केले आहेत.जेव्हा हे व्हिडीओ कुणी शूट केले, याची चर्चा झाली. तेव्हा एका माहितीनुसार शूट केलेल्या व्यक्तीनं पक्षातंर्गत सुधाराच्या हेतूनं ते व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली.

हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सपाच्या अखिलेश यादवांनी हे व्हिडीओ शेअर केलेत. आणि ज्या भाजप आमदारानं अंतर्गत सुधारांसाठी हे व्हिडीओ बनवल्याचा दावा केला, शिवाय त्यांचे आभारही मानले आहेत.याबाबत तीन पत्ती खेळणाऱ्या आमदारांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही..मात्र सभागृहात तंबाखू मळणारे आमदार रवी शर्मांशी आजतक वाहिनीनं संपर्क साधला., तेव्हा आमदार रवी शर्मांनी दिलेल्या उत्तरामुळे हा सारा प्रकार पुन्हा चवीनं चघळला गेला.

पाहा व्हिडीओ:

भाजप आमदार रवी शर्मांच्या दाव्यानुसार ते या व्हिडीओत तंबाखू नव्हे तर मुलेठी खात होते…मुलेठीला आपण जेष्ठमध म्हणतो.मात्र जर ते जेष्ठमध खात असतील तर मग तंबाखूची डबी कशाला असाही प्रश्न त्यांना विचारला गेला.त्यावर माझ्या हातात तंबाखूचीच डबी होती हे आमदारांनी मान्य केलं.मात्र आपण नेहमी तंबाखूच्याच डब्बीत जेष्ठमध ठेवून खातो.असं अजब उत्तर आमदार रवी शर्मांनी दिलंय.

थोडक्यात एवढं बरं झालं की,रवी शर्मांनी तंबाखू मळून झाल्यानंतर त्यातली जाड पानं झटकण्यासाठी टाळी दिली नाही. नाहीतर सभागृहात काहीतरी मोठी घोषणा झाल्याचं समजून इतरांनी टाळ्या वाजवण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.कारण तंबाखू मळताना वाजलेल्या टाळीनं इतर श्रोत्यांनी नंतर टाळ्यांचा पाऊस पाडल्याचे अनेक दुर्मिळ अपघात याआधीही घडले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.