Vidhan Parishad Election : असं काय झालं? की दौरा सोडून दिलीप वळसे-पाटील मुंबईकडे रवाना, विधान परिषदेसाठी हलचाली वाढल्या

राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हेही आपला नियोजित दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं आहे.

Vidhan Parishad Election : असं काय झालं? की दौरा सोडून दिलीप वळसे-पाटील मुंबईकडे रवाना, विधान परिषदेसाठी हलचाली वाढल्या
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 7:06 PM

पुणे : राज्यसभा निवडणुकीतला (Rajyasabha Election) एका जागेवरचा पराभव हा महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) गाफील न राहता महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. तर दुसरीकडे भाजप त्यांच्या पाचही जागा सहज विजयी होतील असा दावा करत आहे. राज्यसभा निवडणुकीआधीही भाजप नेते असाच दावा करत होता. तो दावा भाजपने खरा करून दाखवल्याने आता महाविकास आघाडीतील नेत्यांपुढील आव्हान मोठं असणार आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या गोटातल्या हलचाली आणखी वाढल्या आहेत. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकावर बैठका सुरू आहेत. राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) हेही आपला नियोजित दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीसांचं आव्हान स्वीकारलं आहे.

वळसे पाटलांच्या दौऱ्याचं नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. आंबेगाव तालुक्यातील दोन दिवस दौऱ्या असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आपला दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पाश्वभुमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक असल्याने वळसे-पाटलांना हा दौरा रद्द करावा लागलाय. तर दुसरीकडे भाजपची एक महत्वाची बैठक दुपारीच मुंबईत पार पडलीय. भाजपच्या नेत्यांनी ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी असल्याचे जरी सांगण्यात आले असले तरी या बैठकीत विधान परिषदेवरही नक्कीच चर्चा झाली असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीही जोमाने कामाला लागली आहे.

अजित पवारही घेणार आमदारांची बैठक

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आमदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दुसरीकडे खडसेंना हरवण्यासाठी भाजप जाळं टाकत असल्याचा गोप्यस्फोत इम्तियाज जलील यांनी केल्यानेही महाविकास आघाडी जास्त सावध झाली आहे.

भाजप नेते म्हणतात…

भाजप नेत्यांनी मात्र जलील यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आम्हाला कुणालाही पाळण्याची गरज नाही. आमचा पाचवी उमेदवार संपूर्ण ताकदीने बहुमताने आणि अपेक्षित आहे. त्यापेक्षाही जास्त बहुमताने निवडून येतील त्याची तयारी केली आहे, कुणालाही पाडण्यात त्याला आमचा नादच नाही, अशी प्रतिक्रिया जलील यांच्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर फडणवीसांनीही यावरून एमआयएमवर जोरदार टीका केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.