Vidhan Parishad Election : ‘मी मविआ नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत’, संजय राऊतांवर नाराज आमदार श्यामसुंदर शिंदेंचं वक्तव्य

नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचंही नाव राऊत यांनी घेतलं होतं. आता उद्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. अशावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

Vidhan Parishad Election : 'मी मविआ नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत', संजय राऊतांवर नाराज आमदार श्यामसुंदर शिंदेंचं वक्तव्य
श्यामसुंदर शिंदे, अपक्ष आमदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:32 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभवनानंतर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बविआचे तीन आमदार आणि तीन अपक्ष आमदारांचं नाव घेत त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, असा आरोप केला. त्यात नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे (Shamsundar Shinde) यांचंही नाव राऊत यांनी घेतलं होतं. आता उद्या विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत आहे. अशावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

‘त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची जी भूमिका आहे तिच माझी भूमिका आहे. मी संजय राऊतांशी संपर्क केला नाही. मी त्यांना भेटणार नाही. मी राष्ट्रवादीचा सहयोगी आमदार आहे. आज महत्व वाढलं हे नक्की आहे. शिवसेनेनं मला विचारलं तर मी सांगेन काय नाराजी आहे ते. जे आरोप केले ते परत परत सांगायची गरज नाही. ते गुप्त मतदान होतं त्यामुळे कुणी कुणाला मत दिलं ते कुणी सांगू शकणार नाही. आता विधान परिषदेत विजय कुणाचा होणार हे मी सांगू शकत नाही. मी काही भविष्य सांगणारा नाही’, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

भाजपची दोन मतं राष्ट्रवादीला मिळणार?

विधान परिषद निवडणुकीत भाजपची 2 मतं महाविकास आघाडीलाच मिळणार असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीला चारीमुंड्या चीत करण्याकरिता महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. तिन्ही पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख, पक्षश्रेष्ठींनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. राज्यसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती आता होऊ नये, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे, असंही मिटकरी म्हणाले.

खडसेंचे भाजप आमदारांना फोन!

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी आज मतदानासाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. बंददाराआड झालेल्या या चर्चेचा तपशील उघड झाला नाही. मात्र, खडसे यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. तर, खडसे यांनी आज भाजपच्या काही आमदारांना फोन केल्याचं वृत्त आहे. एवढ्यावेळी तुम्हाला मला मदत करावीच लागेल, असं खडसे या आमदारांना फोनवर बोलल्याचं सांगितलं जात आहे. खडसे यांनी भाजपमध्ये असताना अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली होती. त्यामुळे त्यांनी आता या आमदारांकडे मते मागितली आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.