Vidhan Parishad Election Result 2022 : ‘लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल’, देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला थेट इशारा

विजयी जल्लोषानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थेट इशाराच दिलाय. विधान परिषदेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तनाची नवी नांदी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Vidhan Parishad Election Result 2022 : 'लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल', देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला थेट इशारा
देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला इशाराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:59 AM

मुंबई : राज्यसभे पाठोपाठ भाजपनं विधान परिषद निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जोरदार हादरा दिलाय. भाजपचे चार उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रणनितीचा पुन्हा एकदा विजय झालाय. या विजयानंतर भाजपच्या आमदारांनी जोरदार जल्लोष केला. विधान भवन परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्यासह विजयी उमेदवार आणि भाजपच्या सर्व आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विजयी जल्लोषानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थेट इशाराच दिलाय. विधान परिषदेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तनाची नवी नांदी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

विजयी जल्लोषानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत 123 मतं घेतली होती. आता 134 मतं घेतली आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून आपल्या सदसदविवेक बुद्धीनं आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मत देतील आणि तेच झालं. आमच्या पाचव्या उमेदवाराला एकही मत नव्हतं. पण आमचा पाचवा उमेदवार विजयी झाला.

‘महाराष्ट्रात परिवर्तनाची नवी नांदी पाहायला मिळतेय’

पुन्हा एकदा मी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे आभार मानतो. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आज महाराष्ट्र उभा आहे. या निकालाने महाराष्ट्रात परिवर्तनाची नवी नांदी पाहायला मिळत आहे. आज सरकारमधील असंतोष बाहेर आलाय. आमचा संघर्ष असाच सुरु राहील. लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल, असा इशाराच फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

‘आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आणि परिवर्तनासाठी’

राज्यसभा निवडणूक निकालानंतर फडणवीसांचा चमत्कार अशी चर्चा सुरु होती. त्याबाबत विचारलं असता, कुठलाही चमत्कार मी मानत नाही. याठिकाणी सरकारमधील असंतोष मतांमध्ये परिवर्तीत झालाय. असंतोष धुमसत राहिला की काय होतं हे आजच्या निकालानं दाखवून दिल्याचं फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर तुम्हाला कुणाची जी मतं फुटलेली दिसतात, तो तुमचा कयास आहे. जे सत्तेत आहेत ते केवळ आम्हाला माहिती आहे. सगळ्या पक्षातील त्या आमदारांचे, अपक्ष आमदारांचे मी आभार मानतो. आमचे पाचही उमेदवार विजयी करण्यात त्यांनी हातभार लावला. आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आणि परिवर्तनासाठी आहे, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला हाणलाय.

विधान परिषद निवडणुतील विजयी उमेदवार

भाजप

>> प्रवीण दरेकर – 29 मते >> श्रीकांत भारतीय – 30 मते >> राम शिंदे – 30 मते >> उमा खापरे – 27 मते >> प्रसाद लाड – 28 मते

राष्ट्रवादी काँग्रेस

>> रामराजे नाईक निंबाळकर – 29 मते >> एकनाथ खडसे – 28 मते

काँग्रेस

>> भाई जगताप – 26 मते >> चंद्रकांत हंडोरे – 22 मते (पराभूत)

शिवसेना

>> सचिन अहिर – 26 मते >> आमशा पाडवी – 26 मते

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.