ताई नाही, तर भाजपा नाही, परभणीसह मराठवाड्यात ‘कमळ’ हद्दपार करण्याची समर्थकांची मोहीम, झेडपी, महापालिकेला अडचण?

पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी डावलल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ताई नाही तर भाजपा नाही... अशा आशायाचे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.

ताई नाही, तर भाजपा नाही, परभणीसह मराठवाड्यात 'कमळ' हद्दपार करण्याची समर्थकांची मोहीम, झेडपी, महापालिकेला अडचण?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 10:59 AM

परभणीः ताई नाही तर भाजपा नाही, अशी कठोर भूमिका पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांनी मांडत संपूर्ण मराठवाड्यातून ‘कमळ’ हद्दपार करण्याची मागणी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने पंकजा समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मराठवाड्यातील भाजपचं (Marathwada BJP) ज्वलंत नेतृत्व म्हणून पंकजा मुंडेंची ख्याती आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींपुढे त्यांना अनेकदा नमतं घ्यावं लागतं. यंदादेखील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, असं जवळपास निश्चित वाटत होतं. या निमित्ताने पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी मिळेल, अशी शक्यता वाट होती. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. संधी मिळाली तर त्याचं अवश्य सोनं करीन, असं वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं होतं. मात्र ऐनवेळी सूत्र हलली आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून डच्चू देण्यात आला. यावर मराठवाड्यातील मुंडे समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या या धोरणावर चिडून त्यांनी आमच्या भागातून कमळ हद्दपार करू, असा इशाराच दिला आहे.

मराठवाड्यातील समर्थक नाराज

पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी डावलल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ताई नाही तर भाजपा नाही… अशा आशायाचे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याच्या सोशल मीडियावरील एक पोस्ट अधिकच व्हायरल होत आहे. ताईंना विधान परिषद उमेदवारी न दिल्यामुळे आता गंगाखेड तालुक्यातून ‘कमळ’ हद्दपार करण्याचा इशारा गंगाखेडचे मुंजाराम मुंडे यांनी सोशल मीडियावर दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील समर्थकांनी दिलेला हा इशारा भाजपासाठी धोकादायक ठरू शकतो. ओबीसी समाजाचं खंबीरपणे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील भाजपचं प्रभुत्व कायम राखलं आहे. मागील विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यासमोर हार पत्करावी लागल्यानंतरही पंकजा मुंडेंचा प्रभाव या पट्ट्यात टिकून आहे. मात्र वरिष्ठांनी पंकजांची विधान परिषदेतील नाकारलेली संधी पाहता, भाजपासाठी समर्थकांचा इशारा गंभीर ठरू शकतो.

भाजपाकडून कुणाला उमेदवारी?

पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्यानंतर भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यात प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एक सूर सकारात्मक

दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती तर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यासमोर आगामी विधान सभेत कोण निवडणूक लढवणार हादेखील प्रश्न होता. त्यामुळे पंकजा ताईंनी विधान परिषद निवडणूक लढवू नये, तर विधान सभेचा गड राखण्याचीच तयारी करावी, असा सूर काही समर्थकांमधून उमटत होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी न मिळणं ही चांगली बाब असल्याचा सूर एका गटातून उमटत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.