राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सात यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातवांबद्दल बोलताना वडेट्टीवार ढसाढसा रडले
विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 10:19 AM

मुंबई :  काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय.  राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आलं. ते बोलता बोलता रडायला लागले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. (Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

“राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला”, असं सांगत असताना वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.

वयाने छोट्या राजीवने माझी समजूत काढली

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. मंत्रिमंडळ बनल्यानंतर मी काहीसा नाराज होतो. फडणवीस सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता असल्याने आता सरकार आल्यानंतर साहजिक मंत्री बनल्यानंतर माझी खात्याबाबतीत काहीशी अपेक्षा होती. मी खात्यासंदर्भात नाराज आहे ही गोष्ट राजीवजींना समजल्यानंर त्यांनी मला फोन केला. मला दिल्लीला बोलावलं. मी त्यांना सांगितलं सध्या तरी येणं शक्य नाही. पण आणखी काही दिवसांनी मी दिल्लीला येऊन आपली भेट घेतो. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी माझ्याविषयी संवाद साधला.”

“राजीवजींनी फोन करुन मला सांगितलं. तुम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे, ती नेटाने पार पाडा. तुम्हाला शोभेल अशी तुमच्यावर पुढे मोठी जबाबदारी काँग्रेस पक्ष देईल, काळजीचं काही कारण नाही. त्याची जबाबदारी मी घेतो, असं राजीव सातव मला म्हणाले. लागलीच मी त्यांना होकार दिला आणि पुढे माझं काम सुरु ठेवलं.”

“माझ्यापेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या राजीवजींनी मला समजावलं. माझ्या समस्येवर मार्ग काढला. माझी खंत जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासंबंधी आश्वस्त केलं. आज राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.

दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोलीसारख्या छोट्या जिल्ह्यातून पंचायच समिती सदस्य ते थेट खासदार, राहुल गांधींचा विश्वासू सहकारी, देशाचा राजकारण हाकणारा नेता, राजीव सातव यांचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना वडेट्टीवार यांनी केली.

(Vijay Wadettiwar Emotional  After Rajiv satav pass Away)

हे ही वाचा :

MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी

राजीव सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय? धोका कुणाला?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.