AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भच काँग्रेसला दिशा देईल, थोरातांच्या उपस्थितीत वडेट्टीवारांचं वक्तव्य

वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेले संदीप गड्डमवार आणि रवींद्र शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला

विदर्भच काँग्रेसला दिशा देईल, थोरातांच्या उपस्थितीत वडेट्टीवारांचं वक्तव्य
| Edited By: | Updated on: Dec 23, 2020 | 4:00 PM
Share

मुंबई : आमच्याविरोधात लढणारे पक्षात येत आहेत, हे राजकीय समीकरण चांगलं आहे. विदर्भात काँग्रेसचा प्रभाव वाढत आहे आणि विदर्भच काँग्रेसला पुढची राजकीय दिशा देईल, असं वक्तव्य काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेले शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार (Sandeep Gaddamwar) यांच्यासह रवींद्र शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि खुद्द विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीतच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. (Vijay Wadettiwar says Vidarbha will direct Congress in presence of Balasaheb Thorat)

“काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते घरवापसी करत आहेत. राष्ट्रीय विचारधारा पाळणारा पक्ष म्हणून काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 40 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या उमेदवारांना त्यावेळी ताकद मिळाली असती तर कठीण काळातही काँग्रेस तरली असती. राज्यात वेगळं चित्र दिसलं असतं. पण आता पक्ष वाढवायचा आहे. आागामी महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करा” असे आदेश थोरातांनी कार्यकर्त्यांना दिले..

कोण आहेत संदीप गड्डमवार?

संदीप गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आहेत. ब्रम्हपुरी मतदारसंघातून 2009 मध्येही संदीप गड्डमवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने भाजप उमेदवार अतुल देशकर यांनी निवडणूक जिंकली होती.

2014 मध्ये संदीप गड्डमवार यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र वडेट्टीवारांनी बाजी मारली आणि भाजप उमेदवारानंतर गड्डमवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर गड्डमवार यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक पुन्हा मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात लढवली. पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. परंतु पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसला.

संबंधित बातम्या :

वडेट्टीवारांविरोधात निवडणूक लढलेला शिवसेना उमेदवार वडेट्टीवारांच्या उपस्थितीतच काँग्रेसमध्ये

(Vijay Wadettiwar says Vidarbha will direct Congress in presence of Balasaheb Thorat)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.