चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना? धारदार गाण्याचा सोशल मीडियावर धुडगूस , कोण आहेत युवा कवी विकास लांबोरे?

शिवसेना गमावलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल राज्यातील जनतेत सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याच भावना रत्नागिरीतील युवा कवीने शब्दातून उतरवल्या आहेत

चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना? धारदार गाण्याचा सोशल मीडियावर धुडगूस , कोण आहेत युवा कवी विकास लांबोरे?
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 11:00 AM

महेश सावंत, रत्नागिरी : चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना (Shivsena)… हे गीत सध्या सोशाल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारं गाणं,उद्धव ठाकरे यांच्या वेदना धारदार शब्दात मांडणारं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल राज्यातील जनतेत सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याच भावना रत्नागिरीतील युवा कवीने शब्दातून उतरवल्या आहेत. शिवसेनेच्या सद्यस्थितीवरील कविता सादर करतानाचा व्हिडिओ या तरुण कवीने सोशल मीडियावर अपलोड केला आणि पाहता पाहता तो तुफान व्हायरल झालाय. एवढ्या सटीक भाष्य करणारा हा कवी कोण आहे, यावरून शोधाशोध सुरु आहे.

शिवसेनेच्या वेदनांवर भाष्य

लांजा येथील युवा कवी,लेखक विकास लांबोरे यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.  चार चौघात केलाय गुन्हा, चोरली कुणी शिवसेना, असे हे गीत आहे. सुप्रीम कोर्ट तुम्हा विनंती, ऐकाव्या वेदाना.. संविधानाच्या कलमामधला आयोग लावतोय चुना.. असे या गीताचे बोल आहेत.  आयोगाच्या निकालानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना म्हणत विकास लांबोरे यांनी हे गीत गायले आहे.

व्हायरल झालेली कविता कोणती?

सुप्रीम कोर्टा तुम्हा विनवणी, ऐकाव्या वेदना संविधानाच्या कलमामधला हा आयोग लावतोय चुना चार चौघात केलाय गुन्हा… सांगा चोरली कुणी शिवसेना?

मराठी मुलखाचा अभिमान, शिवसेना अन् धनुष्यबाण सत्तेचा हा माज कशाला.. विचारी जनता जनार्दन सत्ताधाऱ्यांनो बाळगा लाज, जाणा लोकवेदना चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

याची डोळा, याची देही, फोफावली ही हुकुमशाही म्हणे जगात सर्वात मोठी, भारतात या लोकशाही सरन्यायाधीश तुम्हा साकडं, वाचवा हो संविधाना चार चौघात केलाय गुन्हा, सांगा चोरली कुणी शिवसेना?

कोण आहेत विकास लांबोरे?

विकास लांबोरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील मूळ रहिवासी आहेत. सध्या मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. उत्तम कवी, लेखक, गायक अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हातभेटीची ओटी, वस्तीची एस्‌‍टी हे लघुपट लिहिले आहेत. ‘थेट खळ्यातून’ या चारोळी व ‘भोंबडातला डोंगळा’ हा काव्य संग्रही प्रसिध्द झाला आहे. हरवलेलं महोरपण, पावनं जाऊ नका जेवल्याशिवाय, करतो इदवास भगत बुवा, अशी त्यांनी लिहिलेली गाणीही लोकप्रिय आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सध्याच्या राजकीय घडमोडीवर भाष्य करणारी ‘चोरली कुणी शिवसेना’ हे गीतही सध्या चांगले लोकप्रिय व व्हायरल होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.