Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete Passed Away : काल रात्री त्यांचा मला फोन आला आणि आज निधनाची बातमी; विश्वास बसत नाही, बावनकुळेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

विनायक मेटे (Vinayak Mete ) हे सातत्याने मराठा आरक्षणाची लढाई लढत राहिले. मेटे यांनी आपले आयुष्य मराठा आरक्षणासाठी पणाला लावले.  मेटे यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाली असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Vinayak Mete Passed Away :  काल रात्री त्यांचा मला फोन आला आणि आज निधनाची बातमी; विश्वास बसत नाही, बावनकुळेंनी सांगितला 'तो' प्रसंग
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 11:10 AM

मुंबई : शिवसंग्रामचे (sangram party) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघाती (car accident) निधन झालं. मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. याच बैठकीसाठी विनायक मेटे मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. भीषण अपघातात त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने दु:ख झाल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.  विनायक मेटे हे सातत्याने मराठा आरक्षणाची लढाई लढत राहिले. मेटे यांनी आपले आयुष्य मराठा आरक्षणासाठी पणाला लावले.  मेटे यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाली आहे. कालच त्यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. भाजप आणि शिवसंग्राम नेहमीच सोबत राहील असेही ते म्हणाले होते, आणी आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आली, यावर विश्वास बसत नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

विनायक मेटे यांचं आज मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बातम बोगद्याजवळ अपघाती निधन झालं. मेटे यांच्या अपघाताचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू  अनावर झाले. मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी मेटे यांच्या बीडमधील शिवसंग्राम पक्षाच्या कार्यालयात जमण्यास सुरुवात केली आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचे पहायाला मिळत आहे. मेटे यांच्या निधनाने कार्यकर्ते भावूक झाले असून, अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.  विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी देखील काही जणांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

‘अपघातानंतर तासभर उपचारच मिळाले नाहीत’

विनायक मेटे यांच्या गाडीला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तासभर उपचारच मिळाला नसल्याचा धक्कादायक आरोप विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर मेटे तासभर तीथेच पडून होते. मी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला मात्र मदत मिळाली नाही. तसेच  पोलीसही घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.