Vinayak Mete | समोर पांढरी इर्टिगा, दाढीवाला माणूस पुढे जा म्हणत होता, 3 ऑगस्टलाच मेटेंच्या रस्त्यात घडलेला प्रकार काय?अण्णासाहेब मायकरांचे डॉट्स जुळणार का?

अण्णासाहेब मायकर यांनी अशा घातपाताची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केलीय. यासाठी पोलिसांच्या चौकशीलाही तयार असून कुणाच्या धमक्यांना मी घाबरणार नाही, अशी भूमिका मायकर यांनी घेतली आहे.

Vinayak Mete | समोर पांढरी इर्टिगा, दाढीवाला माणूस पुढे जा म्हणत होता, 3 ऑगस्टलाच मेटेंच्या रस्त्यात घडलेला प्रकार काय?अण्णासाहेब मायकरांचे डॉट्स जुळणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 4:28 PM

औरंगाबादः शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झालं. मात्र हा अपघात (Accident) नसून घातपात असावा, असा संशय काहीजणांकडून व्यक्त केला जातोय. यात विनायक मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) यांचं वक्तव्य सातत्याने समोर येतंय. यापूर्वीदेखील मेटे यांचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं वक्तव्य मायकर यांनी केलंय. आज टीव्ही9 शी संवाद साधताना त्यांनी त्या दिवसाची म्हणजेच 3 ऑगस्टची संपूर्ण घटना सांगितली. त्या दिवशीची घटना आणि प्रत्यक्ष मेटेंचा अपघात झाला, ती घटना, यात काहीतरी साम्य, काही संशयास्पद असल्याची भीती व्यक्त केलीय. मायकरांनी व्यक्त केलेल्या संशयावरून तसेच इतरही काही जणांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी ज्या गाडी

त्या दिवशी काय घडलं होतं?

अण्णासाहेब मयेकर यांनी सांगितलं, 3 ऑगस्ट रोजी… मेटे यांचा अपघात होण्याच्या दहा दिवस आधी… बीडहून साडे तीन वाजता निघालो.. पुण्याजवळ रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास दोन ते अडीच किमी अंतर आमचा पाठलाग झाला. एक, दोन, तीन कट मारले. २० फुटांच्या अंतरावर एक आयशर होता. सोबत ड्रायव्हर होता. बॉडिगार्डदेखील होता. ही गोष्ट स्वतः मेटे यांनी पाहिली आहे. साहेबांच्या शेजारी मीच होतो. साहेबांनी आयशरच्या मागेच गाडी ठेवायला सांगितली. समोरच्या गाडीला पाहून साहेबांनी बरं.. बरं… असं म्हणत मान हलवली. समोरच्या गाडीत बसलेला दाढीवाला माणूस फोर व्हिलरला बघून ड्रायव्हरला हात दाखवत होता. गाडी पुढे आण म्हणत होता. पण साहेबांनी आयशरच्या मागेच गाडी ठेवायला सांगितली. नगर-पुणे रोडवर शिक्रापूरच्या जवळपास ही घटना घडली. पुण्यातला एक कार्यक्रम उरकून आम्ही मुंबईला जाऊ लागलो…

पांढऱ्या इर्टिगाचा नंबर नोट केला…

अण्णासाहेब मायकरांनी सांगितलं, त्या पांढऱ्या इर्टिगा गाडीचा नंबर नोट केला. राहुल मस्के यांना नंबर पाठवला. MH 12 TD 8239 हा त्या फोर व्हिलरचा नंबर होता. ज्या दिवशी साहेबांचं अपघाती निधन झालं, तेव्हा मी राहुल म्हस्केंना फोन केला. 3 तारखेलाही असं घडलं होतं. त्यानंतर आम्ही पोलिसांनाही याची माहिती दिली… ज्या वेळी गल्ली दिसली, तेव्हा समोरच्या गाडीने लेफ्ट साईडला कट मारला. गाडी थांबवली. ड्रायव्हरने बॉडीगार्डला सांगितलं, तू खाली उतरून चौकशी कर म्हणाला… पण बॉडीगार्ड उतरला नाही. साहेबांनाही उशीर होत होता… समाधान वाघमोरे… हा त्या दिवशी ड्रायव्हर होता… पण विनायक मेटेंचा अपघात झाला त्या दिवशी समाधानच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं, त्यामुळे त्याला सुटी होती. त्या दिवशी गाडीवर एकनाथ कदम हा ड्रायव्हर होता.

अशा घातपातांचा तपास व्हायलाच पाहिजे

अण्णासाहेब मायकर यांनी अशा घातपाताची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केलीय. यासाठी पोलिसांच्या चौकशीलाही तयार असून कुणाच्या धमक्यांना मी घाबरणार नाही, अशी भूमिका मायकर यांनी घेतली आहे. ते म्हणाले, ‘ आता आमच्या समोर असलेल्या गाडीची आणि मालकाची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून तपास सुरु आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. ही गोष्ट छोटी नाही.. आधी मुंडे साहेबांसोबत झालं. आता मेटेंबाबत झालं. पण अशा घटना बंद व्हायला पाहिजेत….

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.