Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपावर, अखेर विनोद तावडेंनी माडंली आपली बाजू

Vinod Tawde : विरार पूर्वेला आज मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये मोठा राडा पहायला मिळाला. खुद्द भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाले. भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसाला सामान्य कार्यकर्ते तुम्ही इथे का आलात? म्हणून प्रश्न विचारत होते. आता या सर्व वादात विनोद तावडे यांची बाजू समोर आली आहे.

Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपावर, अखेर विनोद तावडेंनी माडंली आपली बाजू
Vindo Tawde
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 3:13 PM

विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आज मोठा राडा झाला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. त्यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन आल्याचा, पैसे वाटपाचा आरोप झाला. बविआचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना जाब विचार होते. तुम्ही इथे का आलात?. हा सगळा राडा कॅमऱ्यासमोर झाला. दरम्यान आता विनोड तावडे यांची बाजू समोर आली आहे.

“नालासापोरा येथे आमदारांची बैठक सुरु होती. आदर्श आचारसंहिता आहे. मतदानाच्या दिवशी व्होटिंग मशीन कशी सील केली जाते, काही आक्षेप असतील तर कसे नोंदवायचे? मी त्यांना हे सांगण्यासाठी तिथे गेलो होतो” असं विनोद तावडे म्हणाले.

‘सीसीटीव्ही फुटेज तपासा’

“बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांना वाटलं की, मी तिथे पैसे वाटण्यासाठी आलोय. निवडणूक आयोग आणि पोलिसांना चौकशी करुदे. त्यातून सत्य काय ते समोर येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासा. मी मागच्या 40 वर्षापासून राजकारणात आहे. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना हे माहित आहे. पक्ष मला ओळखतो. निवडणूक आयोगाने निपक्षपाती चौकशी करावी” असं विनोद तावडे म्हणाले.

हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

“विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. “त्यांनी मला 25 फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं” असं विनोद तावडे म्हणाल्याच हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.