BJP: वेट अँड वॉच ते संजय राऊतांच्या डुकरं, रेडे, डबकंला उत्तर, सुधीर मुनगंटीवारांच्या प्रेसमधले 10 मोठे मुद्दे
आम्हाला वाटते की आता महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावं. त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी योग्य जनहिताचा निर्णय करावा.
नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डबक्यात उतरणार नाहीत, अशी मला खात्री आहे, असं सांगितलं. वेट अँड वॉट ते संजय राऊतांच्या डुकरं, रेडे, डबकंला सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात उत्तर दिलंय. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) अस्थिर परिस्थिती आहे. मात्र अशा अस्थिर परिस्थितीमध्येही काही लोक स्थिर मनाने जीआर काढून पैसे कमावण्याच्या कामात लागले आहेत. अशी शंका भाजपला आल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिले. अशा पत्रावर प्रशासनाकडून (Administration) खुलासा घेणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत. पाहुयात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेसमधील 10 मोठे मुद्दे.
पाहा व्हिडीओ
- संजय राऊतांच्या म्हणण्यावर भाष्य करण्याची वेळ आली नाही. राज्यात अस्थित वाढत आहे. अशावेळी राऊतांचं मनही चंचल आणि अस्थिर होईल. अस्थिर मनानं ते काय भाष्य करतील, याचा भरोसा नाही.
- डुकरं, रेडे, डबकं, असे नवनवीन शब्द महाराष्ट्राला अजून काही दिवस ऐकावे लागतील, असं वाटतं. कारण राज्याचं राजकारण सध्या चंचल आहे. अस्थिरतेमुळं या साऱ्या गोष्टी आठवताहेत.
- शिवसेनेत बंडाळी झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केले होते. या संदर्भात माझ्याकडं माहिती नाही. ही माहिती आपल्याला संजय राऊत साहेबांकडून घ्यावी लागेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
- संजय राऊत यांच्या म्हणण्यावर भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. जशी जशी महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर होईल. तेवढच राऊत यांचा मन चंचल आणि अस्थिर होईल. आणि अस्थिर मनाने ते काय भाष्य करतील याचा भरवसा नाही.
- जेवढे दिवस आवश्यकता असेल वेट अँड वॉच ची भूमिका राहील. वेट अँड वॉच या भूमिकेला वेळेचे आडाखे बांधता येत नाही. अस्थिर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्राचे जनतेचे नुकसान होणार नाही, असं आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
- 24 ऑक्टोबर 2019 साली पत्रकार परिषद घेण्यात आली. गद्दारीची भाषा करण्यात आली. राज्यानं दिलेल्या जनादेशाविरोधात सरकार स्थापन केलं. आमच्यासाठी जनता नाही खुर्ची प्रिय आहे. अशी भावना केली होती.
- आम्हाला वाटते की आता महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावं. त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी योग्य जनहिताचा निर्णय करावा.
- सामना शिवसेनेचा मुखपत्र आहे. त्यामुळे त्यात काय लिहिले जाते यावर विचार करण्याची गरज नाही. त्यात काय भाष्य केलंय, यावर बोलणं म्हणजे मला वाटतं मुखपत्राचं वितरण वाढवण्याचा प्रकार आहे.
- पाऊस येत आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाजावरून काही शेतकऱ्यांना वाटते की आता पेरणीची योग्य वेळ आहे. त्यामुळे आमच्यापैकी काहींना असं वाटत असेल तर ते भाजपची पक्ष म्हणून भूमिका आहे. असा त्याचा अर्थ घेता येणार नाही.
- भाजपला सध्या तरी आपला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही हे पाहतोय की महाविकास आघाडी त्यांचा अल्पमत केव्हा सिद्ध करेल. प्रगत महाराष्ट्रासाठी भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहील.