मोदी खरंच चहा विकायचे का? मोठ्या भावाचं उत्तर
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच चहा विकत होते का हा प्रश्न काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तर मोदींच्या चहा विकण्यावर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. मात्र पंतप्रधान मोदी खरंच चहा विकत होते की नाही याबाबत मोदींच्या भावानेच उत्तर दिलं आहे. मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी टीव्ही 9 मराठीने खास बातचीत […]
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच चहा विकत होते का हा प्रश्न काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने विचारला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तर मोदींच्या चहा विकण्यावर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला. मात्र पंतप्रधान मोदी खरंच चहा विकत होते की नाही याबाबत मोदींच्या भावानेच उत्तर दिलं आहे. मोदींचे भाऊ सोमाभाई मोदी यांनी टीव्ही 9 मराठीने खास बातचीत केली.
मोदी चहा विकायचे का?
काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यावर सोमाभाई यांनी काँग्रेसला उत्तर दिलं. ‘रेल्वे स्टेशनवर आमचं वडिलोपार्जित चहाचं कँटिन होतं. त्या कँटिनवर नरेंद्र मोदी रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी चहा विकायचे’, असं सोमाभाई मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून चहावाला हा मुद्दा प्रचारातील प्रमुख मुद्दा केला होता. त्यानंतर त्यांनी आता आपण देशाचे पंतप्रधान असलो तरी आपण चौकीदार आहोत, देशात अनागोंदी कारभार चालू देणार नाही, असं म्हणत भाजपच्या प्रत्येक मंत्र्याने आपल्या नावापुढे चौकादार लावलं आहे.
नावापुढे चौकीदार का नाही?
‘मी माझ्या नावासमोर चौकीदार लावत नाही, असं सोमाभाई मोदी यांनी सांगितलं. मी तसं माझ्या नावासमोर लावू शकतो, मात्र सध्या लावलेलं नाही, असं सोमाभाई म्हणाले.
सोमभाई मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू आहेत. ते गुजरातमध्ये सामाजिक कार्यात व्यस्त असतात. गुजरातसह महाराष्ट्रात तेली समाजासाठी त्यांनी अनेक कामं केली आहेत.