Washim ZP election result live : वाशिम जिल्हा परिषदेत काट्याची लढाई, कोण बाजी मारणार?

वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे.

Washim ZP election result live : वाशिम जिल्हा परिषदेत काट्याची लढाई, कोण बाजी मारणार?
वाशिम जिल्हा परिषद इमारत
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 8:44 AM

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी एकूण 82 उमेदवार पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची जरी सत्ता असली, तरी या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. यामध्ये काँग्रेसने 14 पैकी 9 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 11, आणि शिवसेनेने 12 आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. या पोटनिवडणुकीमध्ये वंचित आणि जनविकास आघाडीची युती झाली आहे. वंचितने 12 तर जनविकास आघाडीने 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर भाजपाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आता वाशिम जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाशिम जिल्हा परिषदेची एकूण 52 सदस्य संख्या आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसकडे -12
  • काँग्रेस – 10
  • वंचित -8
  • भाजपा – 7
  • जनविकास आघाडी -7,
  • शिवसेना -6
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना- 1
  • अपक्ष -1
  • असे पक्षीय बलाबल होतं.

त्यानंतर रिक्त झालेल्या जागा 14 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली

कोणत्या पक्षाच्या किती जागा रिक्त?

  • वंचित -4
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या-3
  • भाजप -2
  • जन विकास आघाडीच्या- 2
  • काँग्रेस -1
  • शिवसेनेची-1
  • अपक्ष -1

जिल्ह्यातील महत्वाच्या सहा जिल्हा परिषद गटातील मुख्य लढती

1) काटा गटात शिवसेनेचे अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे यांच्या पत्नी ललिता खानझोडे रिंगणात असून, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका देशमुख तर काँग्रेसकडून संध्याताई देशमुख मैदानात आहेत.

माजी सभापती विजय खानझोडे यांनी मागील निवडणुकीत 1000 मतांनी विजय मिळवला होता.

2) पार्डी टकमोर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे राजू चौधरी तर अपक्ष सरस्वती चौधरी यांच्यामध्ये लढत आहे.

काँग्रेसचे राजू चौधरी हे 2010 चे ZP अध्यक्ष होते.

3) उकळी पेन गटामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी आणि वंचितचे दत्ता गोटे यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

4 ) आसेगाव सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची वंचितचे सुभाष राठोड यांच्यामध्ये चुरसीची लढत होणार आहे. त्यामुळं या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत ठाकरे आताचे जी प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे मागील निवडणुकीमध्ये 1400 मतांनी निवडून आले होते. मात्र यावेळी काट्याची लढत असून त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे.

5) तळप बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि बालकल्याण सभापती शोभा गावंडे यांची काँग्रेसच्या रजनी गावंडे यांच्यात थेट लढत होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा गावंडे या 600 मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

6) गोभणी सर्कलमध्ये बेबीताई ठाकरे शिवसेना, रेखा उगले काँग्रेस,पूजा भुतेकर जनविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.

आमदार अमित झनक यांच्या जवळच्या रेखा उगले यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला आहे.

VIDEO : कुठे कुणाची प्रतिष्ठा पणाला?

संबंधित बातम्या  

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Washim ZP Election : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत पंचरंगी सामना, लढत कशी होणार? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....