Video : ‘पवारसाहेंबांचा हात लागल्याशिवाय…’ खुद्द राज ठाकरेंनीच सांगून ठेवलंय गजानन काळेंचं ट्वीट किती खरं?

प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. पण हा दौरा स्थगित करण्याच्या आधीपासून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता.

Video : 'पवारसाहेंबांचा हात लागल्याशिवाय...' खुद्द राज ठाकरेंनीच सांगून ठेवलंय गजानन काळेंचं ट्वीट किती खरं?
राज ठाकरेंच्या त्या विधानाची आठवणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 5:20 PM

मुंबई : श र द प वा र! (Sharad Pawar Politics) महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे किती मोठं नाव आहे, हे खुद्द राज ठाकरेंनीच (Raj Thackeray on Sharad Pawar) सांगून ठेवलेलंय. गेल्या काही काळात राज ठाकरेंनी शरद पवारांना टीकास्त्र जरी सोडलेलं असलं, तरी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Leader Gajanan Kale) एका नेत्यानं केलेली कृती ही राज ठाकरेच्या जुन्या वक्तव्यांना सिद्ध करणारी ठरली. आधारवड या शरद पवारांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. घटना फार जुनी नाही. सात वर्षांपूर्वीचीच आहे. दिग्गजांची हजेरी शरद पवारांच्या आधारवड या कार्यक्रमाला होती. या कार्यक्रमात बोलताना 2015 साली राज ठाकरेंनी केलेली विधानं सात वर्षांनंतर तंतोतंत खरी ठरली आहे. नेमकं असं राज ठाकरेंनी म्हटलं काय होतं? ज्याचा संदर्भ आजही तितकाच चपखल बसतोय, हे जाणून घेणंही राज्याच्या राजकारणात महत्त्वाचंय. गेल्या काही दिवसापासून बृजभूषण सिंह आणि राज ठाकरें हा वाद चर्चेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं जुनं विधानही तितकंच संदर्भासह तितकंच स्पष्टीकरण देण्याइतकं पुरेपूर असल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

‘आधारवड’ या शरद पवारांच्या भव्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन डिसेंबर 2015 साली करण्यात आलेलं होतं. 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस असतो. त्याच दरम्यान, हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय राजकारणी एका मंचावर आले होते. उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचं आगमनच मुळात राज ठाकरेंच्या भाषणावेळी झालेलं होतं. ‘आमचे बंधुराज आले’ असं म्हणत राज ठाकरे यांनी आपलं भाषणही काही काळासाठी थांबवलं होतं. पण त्याआधीच राज ठाकरेंनी काही महत्त्वाची विधानं केली होती. आपल्या भाषणाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलताना म्हटलं होतं, की…

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात मला असं वाटतं की आजही.. एक सवयच जडलेली आहे.. कुठचीही गोष्ट घडो, बहुधा पवार साहेबांचा हात असावा… आता ती चांगली, वाईट. कशी.. आता त्याला पवार साहेबांचा हात असल्याशिवाय, स्पर्श असल्याशिवाय ती बातमीच पुढे जात नाही..

काय निमित्त?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या यांच्या पक्षातील गजानन काळे या नेत्यानं एक ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये गजानन काळे यांनी तीन फोटो शेअर केलेत. या तिन्ही फोटोंमध्ये बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार दिसून आलेत. “ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे … ( फोटो झूम करून पाहावा…) असं म्हणत गजानन काळे यांनी हे फोटो शेअर केलेत.

राज ठाकरेंनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर तो स्थगित करत असल्याचंही जाहीर केलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. पण हा दौरा स्थगित करण्याच्या आधीपासून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता. हा विरोध करणारे बृजभूषण सिंह हे भाजप खासदार असल्यानं राज ठाकरेंना होणारा विरोध हा भाजपकडून होतोय की काय? अशी प्रश्न उपस्थित केला जात होता.

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, पुण्यातील सभेत राज ठाकरेंना महाराष्ट्रातन माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध झाल्याचा आरोप केला. शिवाय हा एक सापळा असल्याचंही म्हटलं होतं. पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेनंतर आता गजानन काळे यांनी केलेल्या ट्वीटनं बृजभूषण सिंह यांच्या मागे पवारांच हात आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जातेय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकूणच या निमित्तानं राज ठाकरेंनी केलेलं 2015 सालचं शरद पवारांबाबतचं वक्तव्य त्यांच्याच बाबतीच खरं ठरताना पाहायला मिळतंय की काय? या प्रश्नावरुन राजकीय जाणकार तर्क वितर्क लढवत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.