Aditya Thackeray Video: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी भाजप कार्यालयातून फोटो काढणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा

सध्या व्हायरल झालेला आदित्य ठाकरे यांचा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातला आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओमध्ये शिवसेनेचे दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत स्टेजवर दिसून आलेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी, आदेश बांदेकर हेही दिसून आलेत.

Aditya Thackeray Video: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी भाजप कार्यालयातून फोटो काढणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा
आदित्य ठाकरेंचा व्हायरल व्हिडिओImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:07 AM

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde Rebel) बंडाळीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना (Shiv Sena News) भेटण्याचा धडाका सुरु केला. एकीकडे शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली बैठकांचं सत्र सुरु झालं. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Adhitya Thackeray Viral Video) महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी शिवसंवाद यात्रेचा आयोजन करण्यात आलं. राज्यभरात आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. अशातच आता आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसैनिकांशी दौऱ्यादरम्यान, संवाद साधताना चक्क भाजप ऑफिस असलेल्या ठिकाणाहून काही कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांचे फोटो काढताना, व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसून आलेत. ही बाब आदित्य ठाकरेंच्या लक्षात आल्यावर त्यांनीही हात उंचावून फोटो, व्हिडीओ काढणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिलाय.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या बंडखोरांच्या मागणीला उद्धव ठाकरेंनी नाकारलं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि भाजप यांनी पुन्हा सरकार स्थापन केलं. सत्तांतराच्या या नाट्यमय घडामोडींनंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दौरा केला होता. शिवसंवाद यात्रा असं या दौऱ्याचं नाव देण्यात आलं होतं. या दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सध्या व्हायरल झालेला आदित्य ठाकरे यांचा व्हिडीओ अलिबागमधील असल्याचं सांगितंल जातंय. बुधवारी आदित्य ठाकरे यांना रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड या भागाचा दौरा केला होता. यावेळी त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं होतं. व्हायरल व्हिडीओमध्ये शिवसेनेचे दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत स्टेजवर दिसून आलेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजन साळवी, आदेश बांदेकर हेही दिसून आलेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक आदित्य ठाकरे काय बोलतात, हे ऐकण्यासाठी उपस्थित होते, असंही व्हिडीओत दिसतंय.

पाहा व्हिडीओ :

सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनातही राजकीय खडाजंगी पाहायला मिळणार, हे नक्की. एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर दुसरीकडे उशिरा झालेला मंत्रिमंडळ विस्तार यावरुन सरकारला घेरण्यासाठी विरोधकही सज्ज झालेत. दरम्यान, गद्दर विधानसभेत नजरेला नजर देऊ शकले नाहीत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली होती. तसंच मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही आमदारांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.