मुंबईत 36-0 रिझल्ट हवाय, मुख्यमंत्र्यांचं नव्या अध्यक्षांना टार्गेट

नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या फायनलमध्ये जे दोन संघ होते, ते आता एकत्र आहेत. मुबंईत 36-0 असा रिझल्ट द्यायचाय, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त अध्यक्षांसमोर केला.

मुंबईत 36-0 रिझल्ट हवाय, मुख्यमंत्र्यांचं नव्या अध्यक्षांना टार्गेट
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 7:11 PM

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत स्पर्धा असली तरी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेबरोबरच लढणार आणि यंदा मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकणार असा विश्वास विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलाय. नवनियुक्त मुंबई अध्यक्ष (Mumbai BJP president) मंगल प्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या फायनलमध्ये जे दोन संघ होते, ते आता एकत्र आहेत. मुबंईत 36-0 (mumbai vidhansabha seats) असा रिझल्ट द्यायचाय, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त अध्यक्षांसमोर केला. यावेळी मुंबईतील इतर महत्त्वाचे नेते आणि मंत्रीही उपस्थित होते.

युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला असो वा मुख्यमंत्री पद ‘आमचं ठरलंय’ असं म्हणता म्हणता, भाजप-शिवसेनेत चित्र रोज बिघडताना दिसतं. भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती करण्यामागचा एक फॉर्म्युला निश्चित झालाय. पण लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेलं यश आणि राज्यात तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने शिवसेनेवर आपलं दबावतंत्र पुन्हा सुरु केलंय. भाजप नेत्यांच्या दररोज होत असलेल्या विधानांनी शिवसेनेच्या उरात धडकी भरायला सुरुवात झाली आहे.

भाजपचे नेते रोज नव्या भूमिकांचा साक्षात्कार होत असल्यामुळे शिवसेनेच्या जीवाला घोर लागलाय. त्यामुळे 2014 विधानसभा निवडणुकीच्या कटू प्रसंगाला पुन्हा सामोरं जावं लागतं की काय याची चिंता शिवसेना नेतृत्वाला लागणं स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्र्यांचे हे ताजे बोल उद्धव ठाकरे यांना नक्कीच दिलासा देणारे आहेत.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला युतीसाठी आश्वस्त केलं असलं, तरी युतीत भाजपचाच वरचष्मा राहील याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली आहे. मंगल प्रभात लोढा (mumbai bjp president) यांच्या नेतृत्त्व गुणांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वेगळं लढलं पाहिजे अशी भूमिका लोढा यांनी मांडली. त्यांनी भाजप कार्यकर्त्याला आत्मविश्वास दिला आणि 8 चे 42 नगरसेवक झाले. भाजपची ताकद दिसली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.