Arpita Mukharjee| ममता आणि मंत्र्यांसोबत फोटो, ईडीच्या छाप्यात 75 कोटी जप्त, पश्चिम बंगालमध्ये चर्चेत.. कोण आहेत अर्पिता मुखर्जी?
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून एवढा पैसा जप्त केल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात जणू भूकंप आला आहे. मुखर्जींच्या फ्लॅटमध्येच 20 कोटींची रोकड सापडली आहे.
मुंबईः पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि राज्याचे उद्योग मंत्री पार्थ चटर्जी (Parth Chatarjee) यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) यांच्या डायमंड सिटी येथील फ्लॅटमध्ये असंख्य खोक्यांमध्ये भरलेल्या नोटा सापडल्या. शनिवारी दिवसभर या नोटा मोजल्या जात होत्या. ही रक्कम जवळपास 75 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. मंत्री पार्थ चटर्जी यांनादेखील कोलकात्यातील बँकशॉल कोर्टात सादर करण्यात आलं. पार्थ चटर्जी यांच्यावर मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ यांना कोर्टाने दोन दिवसांच्या ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्पिता मुखर्जी यांना सोमवारी कोर्टासमोर हजर केलं जाईल. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोलकात्यातील १३ ठिकाणांवर छापे मारले. यात अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमधून कोट्यवधी रुपयांच्या नोटा मिळाल्या. शनिवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली.
West Bengal cabinet minister and former Education Minister of the state Partha Chatterjee is produced to Bankshall Court in Kolkata. Hearing to begin soon
Earlier today the minister was arrested by ED from his residence in connection with SSC recruitment scam pic.twitter.com/dBYpxDl9qt
— ANI (@ANI) July 23, 2022
कोण आहेत अर्पिता मुखर्जी?
ईडीने टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात शुक्रवारी छापेमारी केली. यात माजी शिक्षणमंत्री आणि विद्यमान उद्योगमंत्री पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त केले. अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी ओडिशा फिल्म इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांत भूमिका केली आहे. तर काही तमिळ चित्रपटांतही त्या झळकल्या. पार्थ चटर्जी यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांच्या अनेक सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक वर्षांपासून अर्पिता या कोलकात्यातील आलीशान फ्लॅटमध्ये राहतात. पार्थ चटर्जी यांच्या पूजा समितीतही त्या आहेत. पूजेच्या पेंडॉलच्या सर्व आयोजनात त्यांचा सहभाग असतो. पेंडॉलच्या प्रचार-प्रसारासाठी छापलेल्या पोस्टर्सवर अर्पिता यांचे फोटो असतात.
कुठून जमवला एवढा पैसा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ चटर्जी यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले आहेत. भ्रष्टाचार आणि शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी लाच घेतल्याचा आरोप पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यावर करण्यात आला आहे.
#WATCH | West Bengal: A truck carrying boxes reaches the residence of Arpita Mukherjee, a close aide of WB cabinet minister and former Education Minister Partha Chatterjee
ED recovered huge cash amounting to approximately Rs 20 crores from her residence yesterday. pic.twitter.com/KajHZRGTS9
— ANI (@ANI) July 23, 2022
40 ट्रक भरून पैसा
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून एवढा पैसा जप्त केल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात जणू भूकंप आला आहे. अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमध्येच 20 कोटींची रोकड सापडली. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्या मते, ‘ईडीला दोन दिवसांच्या छापेमारीत 75 कोटींची संपत्ती आढळली आहे. येथील अनेक मंत्र्यांचे बांग्लादेश कनेक्शन देखील आहे. ईडीने पर्दाफाश केलेले हे केवळ छोटे चित्र आहे. तृणमूल काँग्रेसचे एक जिल्हाध्यक्ष आणि मातब्बर नेते अनुब्रत मंडल यांच्या सुरक्षारक्षकाकडून 150 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अजूनही अनेक गोष्टी बाहेर येणं बाकी आहे. अर्पिता मुखर्जी यांचे 8 फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. तर आणखी एका मंत्र्याची निकटवर्तीय महिलेकडे 10 फ्लॅट असल्याचं कळतंय,’ असं दिलीप घोष म्हणाले.