Congress : ‘शिवसेनेच्या नेत्याच मला विचारु नका’, पृथ्वीराज चव्हाणांच्या पहिल्याच वाक्यातून मतभेद आले समोर

विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा धक्का हा कॉंग्रेसला बसला आहे. उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव कॉंग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हक्काची मते असतानाही कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव म्हणजे अंतर्गत काहीतरी घडलेले आहे. त्याचाच शोध आता घेतला जात आहे. त्याचअनुशंगाने कॉंग्रेस पक्षाची देखील मुंबईत बैठक पार पडत आहे.

Congress : 'शिवसेनेच्या नेत्याच मला विचारु नका', पृथ्वीराज चव्हाणांच्या पहिल्याच वाक्यातून मतभेद आले समोर
पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस नेते
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:54 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत एकी नाही हे समोर आलेच आहे. पण तेव्हापासून (State Government) सरकारमध्ये असतानाही प्रत्येक पक्षाने आपआपले बघण्याची भाषा केली होती. तोच प्रकार विधानपरिषदेच्यान निवडणुकीत पहायाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे नाराज मंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी तर 35 आमदारांचा गट निर्माण करुन एक राजकीय भूकंपच घडवून आणला आहे. असे असताना देखील शिवसेनेच्या गोठात काय सुरु आहे याची मला कल्पना नाही. त्याबाबत मला न विचारलेलेच बरे असे म्हणत (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये किती मतभेद आहेत याचे दर्शनच त्यांनी घडवून आणले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर जो-तो पक्ष आपल्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात राहत आहे. असे असताना विधानरिषद निवडणुकीत खंडोरे यांचा पराभवाचे कारण आम्हाला शोधायचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलण्यास टाळले आहे.

हक्काची मते गेले कुठे ?

विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा धक्का हा कॉंग्रेसला बसला आहे. उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव कॉंग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हक्काची मते असतानाही कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव म्हणजे अंतर्गत काहीतरी घडलेले आहे. त्याचाच शोध आता घेतला जात आहे. त्याचअनुशंगाने कॉंग्रेस पक्षाची देखील मुंबईत बैठक पार पडत आहे. मात्र, शिवसेनेच्या नाराज आमदार आणि मंत्र्याच्या प्रकरणापेक्षा आमच्या उमेदवाराचा पराभव कसा झाला याचे कारण शोधणे गरजेचे असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये कीती एकी राहिली आहे हेच समोर येते. कॉंग्रेसची मते कुणाला मिळाली का भाजपाला गेली याचा शोध आता घेतला जात आहे.

कॉंग्रेसमध्येही नाराज आमदार

आमदारांच्या नाराजीचा सूर केवळ शिवसेनेमध्येच आहे असे नाहीतर तीन मते कमी पडल्याने तो कॉंग्रेसमध्येही असल्याचे समोर आले आहे. पण फुटलेली मते नेमकी राष्ट्रवादीला मिळाली का भाजपाला हा मोठा प्रश्न कॉंग्रेसच्या गोठात निर्माण झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत काय रणनिती चुकली यासाठी कॉंग्रेसने बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये इतरांपेक्षा स्वत :च्या पक्षात नेमकं काय घडतंय यावरच भर दिला जाणार असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेबद्दल मौन, महाविकास आघाडीला मात्र धोका नाही

पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेतील नाराज आमदार आणि मंत्र्यांच्या भूमिकेबद्दल चकार एक शब्द काढला नाही. पण महाविकास आघाडीला काही धोका नसल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. सध्या शिवसेनेतील नेत्यांच्या भूमिकेमुळे राजकीय भूकंप घडला असला तरी त्याचे धक्के आपल्या पक्षाला बसू नयेत यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी इतर पक्षात काय सुरुयं यापेक्षा कॉंग्रेसमध्ये काय होऊ नये यावर अधिक भर दिल्याचे दिसतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.