राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपला बेस वाढवण्यासाठी 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा' सुरू केली आहे. (what will happened in maharashtra politics, why ncp launched rashtrawadi parivar samvad yatra?)

राष्ट्रवादीच्या 'संवाद यात्रे'ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 1:20 PM

मुंबई: विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपला बेस वाढवण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत असून इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने आघाडीतही उलथापालथ सुरू झाली आहे. आघाडीतील पक्षांनीही आपला बेस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील खातेबदल करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. राज्यातील पाच महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीत ही उलथापालथ होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (what will happened in maharashtra politics, why ncp launched rashtrawadi parivar samvad yatra?)

काय आहे संवाद यात्रा?

राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या निमित्ताने १७ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत. सध्या ही यात्रा विदर्भात आहे.

यात्रा कशासाठी?

या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठीही ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष किंवा संस्थानिकांचा पक्ष असल्याचं एक चित्रं आहे. ही चौकट मोडून राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि जनतेचा पक्ष असल्याची इमेज निर्माण करायची आहे. पक्षाचं हे स्वरुप बदलण्यासाठी सुद्धा ही यात्रा आयोजित केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निमित्त यात्रेचं पक्षप्रवेश सुरू

राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्या त्या भागातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा धडाकाही राष्ट्रवादीने लावला आहे. त्यातच काँग्रेसचे मातब्बर नेते सुबोध मोहितेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या यात्रेमागचा हेतून पक्ष विस्तार हाच असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मध्यावधीसाठी राष्ट्रवादीची तयारी?

राज्यातील आघाडी सरकारला एक वर्ष होऊन गेलं आहे. कोरोनाचं संकटही ओसरलं आहे. त्यातच या वर्षभरात ठाकरे सरकारने केंद्र सरकारविरोधात अनेक विषयांवर पंगा घेतला आहे. शिवाय महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवत असल्याने राज्यात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. पाच महापालिका निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्यास त्याचा पक्षावर विपरीत परिणाम होणार आहे. तसं झाल्यास भाजपला गळती लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राज्यात कधीही ऑपरेशन लोट्स होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑपरेशन लोट्स होऊन राज्यात मध्यावधी झाल्यास त्याला समोरे जाण्यासाठी सज्ज असावं म्हणूनही राष्ट्रवादीने संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (what will happened in maharashtra politics, why ncp launched rashtrawadi parivar samvad yatra?)

सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?

राज्यातील अनेक महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना नाखूश आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसऐवजी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचं राष्ट्रवादीत घटत आहे. त्यासाठी राज्यातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेचा घरोबा झाल्यास हा कायमचा घरोबा असेल अशी भिती असल्याने भाजपने शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं बोललं जात आहे. (what will happened in maharashtra politics, why ncp launched rashtrawadi parivar samvad yatra?)

संबंधित बातम्या:

काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री कोण होणार? बातमी आली; थोरात, राऊत, वडेट्टीवारांच्या नावांची चर्चा सुरू?

जर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद, तर राष्ट्रवादीला काय?

जयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन?

(what will happened in maharashtra politics, why ncp launched rashtrawadi parivar samvad yatra?)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.