सत्तेत येताच पहिल्या 100 दिवसात पहिलं काम कोणतं करणार?; मोदींनी सांगितलं टॉप सिक्रेट
संविधानाने न्यायालयांना जन्म दिला. शहाबानो केस आली तेव्हा व्होट बँकेसाठी संविधानाचं काय केलं?. सुप्रीम कोर्ट ही संविधानाची मोठी संस्था आहे. त्याच्या भावनेकडे दुर्लक्ष करून संविधान बदललं. अलाहाबाद कोर्टाने निर्णय दिला. त्यांची निवडणूक रद्द केली. त्यांनी संविधानाला कचऱ्यात फेकलं. आणीबाणी लागू केली. त्यांनी संविधानाचा उपयोग केवळ आणि केवळ आपल्या एकाधिकारासाठी केला. देशातील सरकारांना 356 चा वापर करून शंभर वेळा त्यांनी खतम केलं. एका पंतप्रधानांनी तर एकट्याने50 वेळा हा प्रकार केला. यांच्याच कुटुंबातील हा पंतप्रधान आहे. संविधानाला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. एवढंच नव्हे तर सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात अत्यंत महत्त्वाची कामे केली जाणार आहे. या 100 कामात सर्वात पहिलं काम कोणतं करणार? याची माहितीही मोदींनी दिली आहे. पहिल्या 100 दिवसात आम्ही काय काम करणार आहोत, हे तुम्हाला आज उघडपणेच सांगतो. सत्तेत आल्यानंतर मी सर्वात प्रथम संविधानाची पंचाहत्तरी साजरी करणार आहे. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम राबवले जाणार आहेत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संविधान बदलणार असल्याच्या विरोधकांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे.
टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दावा केला आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या पाच संपादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. यावेळी मोदी यांनी संविधानाबाबतची भाजपची भूमिकाच स्पष्ट केली. माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये पहिल्या 100 दिवसाची कामे मी हाती घेणार आहे. त्यातील एक काम काय करणार ते सांगतो. आज माझा पत्ता उघड करतो. संविधानाला 75 वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने संविधानाची पंचाहत्तरी साजरी केली जाणार आहे. प्रचंड उत्साहात देशात हा उत्सव साजरा केला जाईल. माझ्या माझ्या पहिल्या 100 दिवसातील कामातील हे एक महत्त्वाचं काम राहणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लोकांना संविधान समजलं पाहिजे, संविधानाचं महात्म्य समजलं पाहिजे. संविधानात जेवढी अधिकाराची चर्चा होते, तेवढीच कर्तव्याची झाली पाहिजे. कारण देशात कर्तव्याची भावनाही जागृत झाली पाहिजे. मी संविधानातील अधिकारासोबतच संविधानातील कर्तव्याची भावनाही लोकांमध्ये जागृत व्हावी म्हणून येत्या वर्षभरात काम करणार आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.
हा बाबासाहेबांचा अपमान नाही का?
त्यांच्यासाठी संविधान हा एक खेळ आहे. देशात 75 वर्षात भारताचं संविधान लागू झालं आहे का? जे लोक बोलत आहेत, ते बेईमानी करत आहेत. 60 वर्ष यांनी राज्य केलं. काश्मिरात भारताचं संविधान लागू होत नव्हतं. जर संविधानाचं तुम्हाला एवढं पावित्र्य वाटत होतं, तर काश्मीरमध्ये तुम्ही संविधान का लागू केलं नाही? 370 ची भिंत बांधून भारताचं संविधान का अडकवून ठेवलं? हा बाबासाहेबांचा अपमान आहे की नाही? जम्मू काश्मीरमध्ये जो दलित समाज आहे. त्यांना गेल्या 75 वर्षात आरक्षण मिळालेलं नाही. कोणताही अधिकार मिळाला नाही. त्यावेळी यांना रडू कोसळलं का नाही. तिथे आदिवासी आहेत. त्यांनाही अधिकार नाही मिळाला. त्याबद्दलही यांना रडू कोसळलं नाही. आमच्या आयाबहिणी आहेत. त्यांना कोणताच अधिकार नाही. कारण तिथे संविधान नव्हतं. त्यांचं संविधान होतं, असं मोदी म्हणाले.
संविधानाची ओरिजनल प्रिंट…
काँग्रेसने संविधानासोबत नेहमी छेडछाड केली. नेहरू… तुम्ही त्यांना लोकशाहीचा चेहरा म्हणता ना… संसदेत त्यांनी सर्वात आधी संविधानात दुरुस्ती केली ती फ्रिडम ऑफ स्पीचवर रिस्ट्रिक्शन आणणारी. नेहरुंचं हे काम पूर्णपणे अलोकशाहीवादी होतं. देशाच्या संविधानात मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक तर खूप अनुभवी लोकांनी… भारताची नसनस माहीत असलेल्या लोकांनी संविधान तयार केलं. त्यात तो सुगंध आहे. त्यामुळेचं संविधानाला सामाजिक दस्ताऐवज म्हणतात. त्यात तो सुगंध आहे. दुसरं म्हणजे हे लोक पुढचा विचार करायचे. संविधानात भविष्यात देश पुढे कसा जाईल याची व्यवस्था आहे.
तिसरं म्हणजे, ते शब्दात नाही. पण पेटिंग आहे. पहिल्या संविधानाच्या प्रत्येक पानावर पेंटिंग आहे. ती पेंटिंग आपल्याला हजारो वर्षाला जोडणारी एक लिंक आहे. एक साखळी आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या मान्यता या सर्व गोष्टी त्या चित्रात आहे. चित्रात यासाठी की देश लवकर समजला जावा. कारण लांबलचक इतिहास लिहायची वेळ येऊ नये. शब्दात वर्तमान आणि येणारा काळ ठेवला गेला आहे. त्यामुळे काल, आज आणि उद्या याचा एक संतुलित आणि पवित्र दस्ताऐवज आपलं संविधान आहे. काँग्रेसने सर्वात आधी संविधानातील मूळ प्रतमधील देशाच्या परंपरेचा भाव होता तो नष्ट केला. नवीन प्रिंट काढली. त्यामुळे ओरिजिनल संविधानाची एकही प्रिंट नव्हती. ज्यावेळी आम्ही नव्या संसदेचं अनावर केलं, तेव्हा आम्ही ओरिजिनल प्रिंट छापली. कारण माझ्या मनात होतं. त्यामुळे जसं सेंगॉल आम्ही संसदेत ठेवलं. तसंच आम्ही संविधानाची ओरिजिनल प्रिंट संसदेत ठेवली, असंही त्यांनी सांगितलं.