Narayan Rane : पक्ष तर संपलाच, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचे भवितव्यही सांगितले, म्हणाले….!
पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्वांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपवायची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. तर संपून गेलेल्यांना काय संपवायचे असा सवाल राणे यांनी उपस्थित तर केला
संदीप राजगोळकर प्रतिनीधी मुंबई : रामदास कदमांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टोकाची टीका केली आहे. पक्षाच्या अस्तित्वापासून ते उद्धव ठाकरे यांचे भवितव्य काय असणार हे देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकले आहे. शिवसेना (Shiv sena) आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे नारायण राणे यांनी आज मात्र, टोकाची भूमिका घेतली होती. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्वांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपवायची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. तर संपून गेलेल्यांना काय संपवायचे असा सवाल राणे यांनी उपस्थित तर केलाच पण आता ते कधी जेलमध्ये जातात हेच पहायचे असल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना- शिंदे गटाबरोबरच आता शिवसेना भाजप यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
भाजप आणि शिंदे गटाला धमक्यांची भाषा वापरु नये असेही अवाहन नारायण राणे यांनी दिले. तर भाजप आणि मित्र पक्ष असलेल्या शिंदे गटातील एकाही पदाधिकाऱ्यांच्या केसालाही धक्का लावला तरी मुंबईत फिरु दिले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दिला आहे.