Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये पाहणी केल्यानंतर आज ते सांगलीला रवाना झाले. त्यादरम्यान त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 11:23 AM

सातारा : सत्ता स्थापनेसाठी आम्ही कुठेही प्रयत्नशील नाही. हे सरकार अंतरविरोधाने पडेल. आता आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे. ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी आम्ही पर्याय देवू, असा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. तसंच पूरग्रस्तांवरील संकट मोठं आहे, त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये पाहणी केल्यानंतर आज ते सांगलीला रवाना झाले. त्यादरम्यान त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

राज्य सरकार पॅकेज वगैरे जाहीर करणार आहे असं आम्ही ऐकतोय. ते पॅकेज वगैरे द्यायचं तेव्हा द्या, पण आता लोकांच्या घरात चिखल गाळ गेला आहे, घरं पडली आहेत, नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ तातडीची मदत द्यावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आंतरविरोधाला सुरुवात

सत्ता स्थापनेसाठी आम्ही कुठेही प्रयत्नशील नाही. हे सरकार अंतरविरोधाने पडेल. आता आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे. ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी आम्ही पर्याय देवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्री घोषणा करतात, कॅबिनेटला गेलेले नसतात. महाविकास आघाडीत समन्वयाला वेळ लागतोय. बहुतांश ठिकाणी तातडीची मदत मिळालेली नाही, असं फडणवीसांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना सोबत घेऊन बसावं आणि मदतीबाबत निर्णय घ्यावा, असा सल्ला फडणवीसांनी दिला.

आम्ही घरभाडेही दिले

NDRF च्या निकषाच्या पलिकडे जाऊन सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी. 2019 मध्ये सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी आम्ही नियमांच्या पलिकडे जाऊन मदत केली. ज्यांची घरं पडली त्यांना मदत केलीच, पण घरं होईपर्यंत त्यांना आम्ही घरभाड्याचे पैसेही दिले. त्यामुळे ज्यावेळी एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती असते, तेव्हा निर्णयही एक्स्ट्राऑर्डिनरी घ्यायचे असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बुडव्यांना मदत करू नका अशी आमची भूमिका आहे. बारमालकांना खुशाल मदत करावी, पण आधी पूरग्रस्तांना मदत करा. पूरांग्रस्ताना मदत करणं याला प्राधान्य द्यावं, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

केंद्र सरकारचं अभिनंदन करायला हवं. सहकार खात्यामुळे ग्रामीण अर्थव्यस्था मजबूत होणार आहे. केंद्र सरकारनं हा खूप चांगला निर्णय घेतला आहे, असं फडणवीस म्हणाले.

संजय राऊतांवर निशाणा

यावेळी फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर नाव न घेता टीका केली. कांगावाखोरांना मी उत्तर देत नाही. तुम्ही चांगले वागले तर कशाला ईडी आणि सीबीआय येईल? सीबीआय आणि ईडीची चौकशी केद्रानं लावली नाही. सीबीआय आणि ईडीची चौकशी ही उच्च न्यायलायच्या निर्णयान होत आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई लोकल

मुंबईची लोकल रेल्वे सामान्य माणसांची लाईफलाईन आहे. सामन्यांना लोकल नसल्यामुळे खर्च आणि प्रवासाचा वेळ वाढला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी त्यासाठी पाठपुरावा केला. दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल सुरू करावी. एक डोस घेतलेल्यांनाही परवानगी देता येऊ शकेल. परंतु कुठूनतरी सुरूवात व्हायला हवी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसेसोबत युती होणार का?

मुंबईची अवस्था पाहून कुठलाचं पक्ष गप्प राहू शकत नाही. उत्तर भारतीयांबद्दल भूमिका आणि भाषेवर आधारित गोष्टी भाजपला मान्य नाहीत. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी तूर्तास मनसेसोबत युती होणार नसल्याचे संकेत दिले.

दौऱ्यांचा ताण यंत्रणांवर नको

दौऱ्यांचा ताण बचाव कार्यावर पडू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. सरकारनं आक्रोश समजून घ्यायला पाहिजे. दौरे होत असताना मदत मिळायला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

VIDEO : देवेंद्र फडणवीस Exclusive

संबंधित बातम्या  

VIDEO : देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले, निवारा छावणीतच जेवले!

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.