Video : Rajya Sabha Election Result 2022 : मुख्यमंत्र्यांना कोणता आमदार भेटू शकतो?, अपक्ष आमदारांच्या मर्मावर अनिल बोंडेंनी ठेवले बोट

मागच्या वेळी पीएम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून शिवसेनेनं आपले आमदार निवडून आणले. फसवेगिरीनं मागच्या वेळी विजय मिळवला. यावेळी मात्र, तिन्ही पक्ष एकत्र येऊनही ते राज्यसभेसाठी आपला एक उमेदवार निवडून आणू शकले नाही. विशेष म्हणजे संजय राऊतांचा मतं मिळविण्यात शेवटचा नंबर आहे. खूप कमी मतांनी त्यांना विजय मिळाला, हे विसरू नये.

Video : Rajya Sabha Election Result 2022 : मुख्यमंत्र्यांना कोणता आमदार भेटू शकतो?, अपक्ष आमदारांच्या मर्मावर अनिल बोंडेंनी ठेवले बोट
अपक्ष आमदारांच्या मर्मावर अनिल बोंडेंनी ठेवले बोट Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 9:49 AM

मुंबई : मविआचे मतदार वैतागलेले आहेत. आमदार विटलेत. एक संजय जाणार हे वक्तव्य खरं ठरलं. मविआचे आमदार विटलेत. अपक्ष आमदार किती दिवस अपमान सहन करणार. मंत्री आमच्याकडे कमिशन (Commission) मागतात. असं जर आमदारच सांगत असतील, तर काय बोलणार. मुख्यमंत्र्यांशी कोणता आमदार भेटू शकतो का. मंत्रीतरी भेटू शकतो का.. म्हणू ते विटलेत, अशी खरबरीत टीका नवनियुक्त राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. संजय राऊत आणि शिवसेना (Shiv Sena) जी मागच्या निवडणुकीत जिंकली ती मोदींचे फोटो लावून. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असं सांगून शिवेसेनेनं आपले आमदार निवडून आणले, असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ काय म्हणालेत, अनिल बोंडे

आपआपसातल्या कहलानं हे सरकार पडेल

अनिल बोंडे म्हणाले, हा जोर का धक्का धिरे से लगा, असं आहे. पण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणतील, काही लागलं नाही. धक्का लागला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी नेता असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. माणसं जवळ करणारा, विश्वास ठेवणारा असा नेता राज्यात फक्त देवेंद्र फडणवीस आहे. म्हणूनच शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करतात. महाविकास आघाडीचे सरकार केव्हा पडेल, याचा कुणी मुहूर्त सांगू नये. आपआपसातल्या कहलानं हे सरकार पडेल.

हे सुद्धा वाचा

मागच्या वेळी फसवेगिरीनं विजय मिळवला

अनिल बोंडे म्हणाले, मी आमदार असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तेव्हा दुपारी एक वाजतापासून देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी लाईन लागायची. फडणवीस आमदारांचे प्रश्न सोडवायचे. पण, आता मुख्यमंत्री सहसा कुणाला भेटत नाहीत. आमदारांना तर सोडा मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांशी भेटता येत नाही. अपक्ष आमदार म्हणतात, मंत्री कमिशन मागतात. मुख्यमंत्र्यांशी कोणता आमदार भेटू शकतो, असा सवालही अनिल बोंडे यांनी केला. मागच्या वेळी पीएम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून शिवसेनेनं आपले आमदार निवडून आणले. फसवेगिरीनं मागच्या वेळी विजय मिळवला. यावेळी मात्र, तिन्ही पक्ष एकत्र येऊनही ते राज्यसभेसाठी आपला एक उमेदवार निवडून आणू शकले नाही. विशेष म्हणजे संजय राऊतांचा मतं मिळविण्यात शेवटचा नंबर आहे. खूप कमी मतांनी त्यांना विजय मिळाला, हे विसरू नये.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.