Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane | नितेश राणेंच्या वकिलांनी कोर्टात केलेली ‘ती’ चूक, जी घरत यांनी सुधारली! नेमकं काय झालं?

जोरदार युक्तिवाद संपल्यानंतर आता गुरुवारी नेमकं कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचंय. नितेश राणेंना जेल होणार की बेल होणार, हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

Nitesh Rane | नितेश राणेंच्या वकिलांनी कोर्टात केलेली 'ती' चूक, जी घरत यांनी सुधारली! नेमकं काय झालं?
जोरदार युक्तिवाद
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:49 PM

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) अटक होणार की नाही? जामीन (Jail or Bail?) मिळणार की नाही? याचा जोरदार युक्तिवाद सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Court) सलग दुसऱ्या दिवशी झाला. या वेळी झालेल्या घमासान युक्तिवादावेळी नितेश राणेंचे वकील यांनी चक्क फिर्यादीलाच आरोपी म्हटलं आणि आरोपीला फिर्यादी म्हटलं. याबाबत जेव्हा माध्यमांशी बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत (Pradip Gharat) यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

नेमकं काय झालं युक्तिवाद करताना?

आम्ही युक्तिवाद करताना अडथळा आणला गेला. न्यायालयात जेव्हा संग्राम देसाई युक्तिवाद करत होते, तेव्हा आम्ही कोणताही अडथळा आणला नाही. त्यांना त्यांची बाजू मांडू दिली. दोन तास संग्राम देसाईंनी युक्तिवाद केल्यानंतर त्यांचे अनेक मुद्दे आम्ही खोडून काढले, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलंय. पण आम्ही आमचा युक्तिवाद गुंडाळावा यासाठी संग्राम देसाई यांनी अनेकदा अडथळा आणला, असं वक्तव्य प्रदीप घरत यांनी केलंय.

युक्तिवादावेळचा मजेशीर किस्सा

आरोपींना फिर्यादी आणि फिर्यादींना आरोपी म्हणण्याची चूक नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाईंनी (Sangram Desai) कोर्टात केल्याचं चित्र पाहायला मिळालं. याबाबत जेव्हा प्रदीप घरत यांना विचारणा करण्यात आली, तेव्हादेखील त्यांनी असं घडलं होतं, याला दुजोरा दिला. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलंय की,..

हो.. हो.. ते मी जे वातावरणात एक ताण असतो, तो मी हलका करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी (संग्राम देसाई) अनावधानानं ती एक चूक केली. ती मी त्याच्यासाठी त्यांच्या लक्षात आणून दिली. आणि अगदी गंभीरपणे सांगितलं की, ते जो युक्तिवाद करत आहेत तो आरोपतर्फे करत आहेत, फिर्यादीतर्फ करत नाही आहेत. आणि काय त्यांच्या मनात खेळत असेल.. ते बाहेर पडलं असेल त्यावेळेला..

असं म्हणत हसत हसत प्रदीप घरत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना आटोपतं घेतलं.

संग्राम देसाईंनी सांगितलं की…

दरम्यान, नितेश राणेंच्या वकीलांनी युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टात काय घडलं, याची माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संग्राम देसाईंनी म्हटलं की,….

फोनवरुन कोण किती वेळ कुणाशी बोलतं, याचावरुन तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर येऊ शकत नाही. घटनेच्या नंतर लगेच फोनवर बोलणं वेगळं. कोणत्या कालखंडात बोलणं झालं याची माहिती देण्यात आलेली नाही. तर त्याचा आणि या गुन्ह्याचा संबंध काय? खोडसाळपणे नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

दरम्यान, जोरदार युक्तिवाद संपल्यानंतर आता गुरुवारी नेमकं कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचंय. नितेश राणेंना जेल होणार की बेल होणार, हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूकही उद्याच पार पडणार आहे. या निवडणुकीत कुणाचा विजय होतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या –

मी व्यस्त असल्याने चौकशीला येऊ शकत नाही; नारायण राणेंचे कणकवली पोलिसांना पत्रातून उत्तर

Murder: आईची अब्रू वाचवण्यासाठी वृध्दाची केली हत्या; दोन अल्पवयीन मुली गजाआड

Italy Murder : पत्नीने सेक्स नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय

पाहा व्हिडीओ –

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.