जेटली म्हणाले ‘Q’, राहुल म्हणाले ‘AA’, लोकसभेत टाळलेली नावं कोणती?

नवी दिल्ली : राफेल विमान करारावरुन लोकसभेत आज अभूतपूर्व गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राफेलबाबत बोलत असताना राहुल गांधी यांनी ‘AA’ असा उल्लेख केला. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तरात ‘Q’ असा उल्लेख […]

जेटली म्हणाले 'Q', राहुल म्हणाले 'AA', लोकसभेत टाळलेली नावं कोणती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : राफेल विमान करारावरुन लोकसभेत आज अभूतपूर्व गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राफेलबाबत बोलत असताना राहुल गांधी यांनी ‘AA’ असा उल्लेख केला. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तरात ‘Q’ असा उल्लेख केला. हे ‘AA’ आणि ‘Q’ नेमके कोण आहेत?

संबंधित बातमी : तुम्ही Q च्या मांडीवर खेळत होता, जेटलींचा राहुल गांधींवर हल्ला

‘AA’ अर्थात अनिल अंबनी कोण आहेत?

अनिल अंबानी हे भारतीय उद्योगपती असून रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत. रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कम्युनिकेशन या कंपन्यांचे ते मालक आहेत. 44 एफएम चॅनेल, देभरात DTH नेटवर्क, अॅनिमेशन स्टुडिओ आणि काही मल्टिप्लेक्स सुद्धा अनिल अंबानींच्या मालकीचे आहेत.

राफेल करारात अनिल अंबानींना लाभ मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेल विमान खरेदीसाठी HAL या अनुभवी कंपनीला बाजूला सारुन कुठलाही अनुभव नसलेली अनिल अंबानींची कंपनी ऐनवेळी खरेदी प्रक्रियेत आणली गेल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

‘Q’ अर्थात ओट्टोव्हिओ क्वात्रोची कोण होता?

इटलीतील उद्योगपती ओट्टोव्हिओ क्वात्रोची हा राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात गाजलेल्या बोफोर्स घोटाळ्यातील प्रमुख आरोपी होता. जुलै 2013 मध्ये क्वात्रोची याचं 72 व्या वर्षी इटलीतील मिलान शहरात निधन झालं. क्वात्रोची हा गांधी घराण्याचा निकटवर्तीय मानला जात होता.

1987 मध्ये भारताने स्वीडनमधील एबी बोफोर्स या शस्त्रकंपनीने 410 बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या. त्यानंतर स्वीडनमधीलच सरकारी रेडिओ चॅनलने या बोफोर्स व्यवहारात घोटाळा झाल्याची बातमी दिली. 64 कोटींची दलाली घेतल्याचे रेडिओ चॅनलने म्हटले. त्यानंतर सीबीआयने 1990 साली या प्रकरणात केस दाखल केली. क्वात्रोची प्रमुख आरोपी असूनही एकदाही भारतीय न्यायालयात हजर झाला नाही. 2007 साली अर्जेंटिनाच्या पोलिसांनी इंटरपोलच्या वॉरंटवर क्वात्रोचीला अटक केली होती. मात्र, भारताकडे प्रत्यर्पण होऊ शकले नाही.

2011 मध्ये दिल्ली कोर्टाने क्वात्रोचीच्या बोफोर्समधील दलाली प्रकरणाची चौकशी बंद करण्याला मंजुरी दिली. क्वात्रोची गांधी कुटुंबीयांचा निकटवर्तीय असल्याने त्याला पाठीशी घातल्याचा आरोप झाला. मात्र, विरोधकांचे हे आरोप कधीच सिद्ध होऊ शकले नाहीत.

लोकसभेत काय झालं?

राफेल करारावरुन लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची राफेलसंदर्भातील कथित ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी मागितल्यानंतर लोकसभा सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा सुरु झाला. मात्र, कुठलीही खातरजमा नसताना अशाप्रकारची ऑडिओ क्लिप लोकसभेत प्ले करु शकत नाही, असे म्हणत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. मात्र, तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक होत, ऑडिओ क्लिप प्ले करत नसाल, तर ट्रान्सस्क्रिप्ट वाचून दाखवण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यालाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.