Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा?

पंजाबी कुटुंबातील नवनीत राणा यांचे वडील हे भारतीय लष्करात होते | Navneet Rana Kaur

Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा?
नवनीत राणा कौर, खासदार
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 4:09 PM

मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या कायम चर्चेत असतात. चित्रपटसृष्टी ते राजकारणापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे अनेक किस्से राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतात. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. (Who is Maharashtra MP Navneet Rana Kaur)

कोण आहेत नवनीत राणा?

नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला. त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करायच्या. मात्र, 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. नवनीत राणा यांचा विवाहसोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. 3100 जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

नवनीत राणांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

पंजाबी कुटुंबातील नवनीत राणा यांचे वडील हे भारतीय लष्करात होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नवनीत राणा यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी सहा म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले. दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर सीनु वसंथी लक्ष्मी या तेलुगू चित्रपटात त्यांनी काम केले. त्यानंतर अनेक तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही नवनीत राणा यांनी काम केले. मात्र, 2011 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

नवनीत राणा राजकारणात कशा आल्या?

नवनीत राणा यांचे लग्न झाले तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या.

मात्र, 2019 च्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीच्या तिकीटावर स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या.

नवनीत राणा आणि अरविंद सावंतांमध्ये शाब्दिक युद्ध

सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारविरोधात संसदेत रान उठवणाऱ्या नवनीत राणा नुकत्याच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. आपण ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले होते. मात्र, अरविंद सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

संबंधित बातम्या :

नवनीत राणांचे आरोप अरविंद सावंतांनी फेटाळले, आम्ही महिलांना कधीच धमकावत नाही- सावंत

लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात

Breaking : शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात नवनीत राणांची तक्रार, संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा आरोप!

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.