Nawab Malik | यूपीत जन्म, भंगारवाला, 25व्या वर्षी पहिली निवडणूक, मंत्री ते ईडीची अटक! मलिकांच्या 25 मोठ्या गोष्टी

Who is nawab malik : नवाब मलिक कोण आहे? त्यांची राजकीय कारकिर्द कुठून सुरु झाली? ते मंत्री कसे बनले? कोणकोणत्या पक्षाचा ते भाग होते? यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात

Nawab Malik | यूपीत जन्म, भंगारवाला, 25व्या वर्षी पहिली निवडणूक, मंत्री ते ईडीची अटक! मलिकांच्या 25 मोठ्या गोष्टी
नवाब मलिक नेमके कोण आहेत?
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:18 PM

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) हे नाव आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून चांगलंच चर्चेत आलं. पण हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारण नवाब मलिकांचं नाव घेतलं गेलं. गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांना एकदा तर आपलं मंत्रिपदही सोडावं लागलं होतं. ऐन तारुण्यात लोकसभा निवडणूक लढवलेल्या नवाब (Who is Nawab Malik) यांच्याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहे. सोप्या 25 (Top 25) मुद्द्यांमधून जाणून घेऊयात, नेमके नवाब मलिक कोण आहेत? त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता? आणि नवाब मलिक का आताच्या राजकारणातला महत्त्वाचा चेहरा का आहे, हे समजून घेऊयात…

नवाब मलिक यांच्या TOP 25 बाबी

  1. नवाब मलिकांचं मूळ उत्तर प्रदेशात, पण त्यांच्या जन्माआधीपासून नवाब मलिकांचे वडील मुंबईत स्थायिक, पण काही कारणास्तव पुन्हा उत्तर प्रदेशात गेले
  2. 20 जून 1959 रोजी नवाब मलिक यांचा जन्म झाला उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातल्या उतरौला तालुक्यातील दुसवा गावातला
  3. मलिक कुटुंबीयांचा पहिल्यापासूनच भंगारचा व्यवसाय
  4. मुंबईतील डोंगरी परिसरात मलिक कुटुंब वास्तव्यास
  5. 21व्या वर्षी मलिकांचा मेहजबीन यांच्याशी विवाह
  6. नवाब मलिक यांना फराज, आमीर दोन मुलं, तर निलोफर आणि सना या दोन्ही
  7. विद्यार्थी आंदोलनापासून नवाब मलिक सक्रिय
  8. मुंबई विद्यापिठाच्या फीवाढीविरोधातील आंदोलनापासून राजकारणात रुची
  9. वयाच्या 25 व्या वर्षी 1984 साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली
  10. गुरुदास कामत यांच्याविरोधात उभे राहिलेल्या मलिकांनी मिळाली 1984च्या लोकसभा निवडणुकीत अवघी 2620 मतं
  11. 1991 साली महापालिका निवडणुकीचं तिकीट काँग्रेसकडून नाकारण्यात आलं
  12. 1992च्या दंगलीनंतर मलिकांनी वृत्तपत्र सुरु केलं, या वृत्तपत्राचं नाव सांज समाचार
  13. पुढे आर्थिक अडचणींमुळे सांज समाचार वृत्तपत्र बंद पडलं
  14. काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानं नवाब मलिकांचा समाजवादी पक्षात प्रवेश
  15. 1995च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून उमेदवारी
  16. 1995च्या विधानसभा निवडणुकीत मलिकांचा शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत महाडिकांकडून पराभव
  17. 1996 फेरनिवडणुकीत मात्र साडेसहा हजार मतांच्या फरकानं विजय आणि विधानसभेत इन्ट्री
  18. 1999साली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय, गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाचीही वर्णी
  19. समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेदांना कंटाळून अखेर पक्षाला सोडचिट्ठी आणि 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मलिकांचा प्रवेश
  20. राष्ट्रवादीकडून मलिकांना उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय मंत्रिपद
  21. माहीममधील जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा मलिकांवर आरोप, त्यानंतर मलिकांवर राजीनामा देण्याची वेळ
  22. 2008 साली नवाब मलिक पुन्हा एकदा मंत्रिपदावर
  23. नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर यांचे पती समीर खान यांना एनसीबीकडून अटक
  24. कॉर्जेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर मलिकांची आक्रमक भूमिका
  25. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली असल्यानं मलिकांना ईडीकडून 7 तासांच्या चौकशीनंतर अटक

संबंधित बातम्या :

नवाब मलिकांसंदर्भातील ताजे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Ashish Shelar on Nawab Malik | ‘पवारसाहेब मोठे नेते, त्यांना आम्ही काय सांगणार! पण…’

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…

Nawab Malik : झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंंगे, ईडीच्या ताब्यातून नवाब मलिकांचा एल्गार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.