कोण राज ठाकरे? आता शिवसेना राज्यात नव्हे, देशात वाढणार : अबू आझमी
समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी (Abu Azami attack Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी (Abu Azami attack Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन (Abu Azami attack Raj Thackeray) दिल्याने अबू आझमी आक्रमक झाले आहेत. “राज ठाकरे कोण आहेत? मनसेचा अवघा एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने एवढा मोठं केलं आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही”, असं अबू आझमी म्हणाले.
मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे आमदार त्रस्त आहेत, त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं अबू आझमी म्हणाले.
राज ठाकरे आता भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असं म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं.
शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा मनसे प्रयत्न करीत आहे. सरकार स्वतः पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्याचे काम करत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असंही अबू आझमींनी स्पष्ट केलं.
शरद पवारांच्या हटवलेल्या सुरक्षेबाबतही अबू आझमींनी भाष्य केलं. सुरक्षा काढण्यापूर्वी लोकांना कळवायला हवं, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या
आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं : अबू आझमी
राज ठाकरेंचा नागरिकत्व कायद्याला पाठिंबा, मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा!