Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात महाविजय मिळवला. भाजपचे आकडे पाहून सगळेच हैराण झालेत. हे असं कसं घडलं? असा प्रश्न भाजप विरोधकांना पडला आहे. पण भाजपच्या या यशामागे एक चेहरा आहे, जो फार कोणाला माहित नाहीय, त्याचं नाव आहे शिव प्रकाश. कोण आहेत हे शिव प्रकाश?

महाराष्ट्रात भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
Shiv Prakash-Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 1:37 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांनी 235 जागा जिंकून इतिहास रचला आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या ऐतिहासिक विजयामागे अनेक कारणं आहेत. महाराष्ट्रात भाजपाला जे यश मिळालं, त्यामागे महामंत्री शिव प्रकाश यांचं योगदान सुद्धा महत्त्वाच आहे. शिव प्रकाश यांनी महाराष्ट्राच्या आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय.

2017 साली उत्तराखंड आणि 2023 साली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा मार्ग कठीण होता. त्यावेळी शिव प्रकाश यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी मायक्रो मॅनेजमेंटच्या प्लानची अंमलबजावणी केली. त्यानंतर या राज्यात भाजप सत्तेवर आली. 2017 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिव प्रकाश यांच्या रणनितीमुळेच भाजपला पुन्हा सत्ता मिळाली होती.

महाराष्ट्रात थांबून संघटनेला योग्य दिशा दाखवली

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी जून महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत भाजपचे राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिव प्रकाश यांनी महाराष्ट्रात थांबून संघटनेला योग्य दिशा दाखवली. बूथ स्तराच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली. यातून सर्व कार्यकर्त्यांना संदेश गेला की, पक्षाचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जातेय. भाजपचा जो कोर वोटर आहे, जो लोकसभा निवडणुकीत सक्रीय नव्हता, त्याला पुन्हा भाजपासोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यकर्त्यांच म्हणणं ऐकलं

शिव प्रकाश यांनी बूथची चार कॅटेगरीमध्ये विभागणी केली. A, B, C आणि D यात B आणि C बूथवर जास्त कार्यकर्ते लावून बूथ जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सर्व विधानसभा क्षेत्रातील नाराज आणि प्रभावशाली लोकांची यादी बनवून त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवाराला मजबूत बनवलं. सर्व कार्यकर्त्यांच म्हणणं वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या.

शिव प्रकाश मुळचे कुठले?

शिव प्रकाश मूळचे मुरादाबादचे आहेत. भाजपत येण्याआधी ते संघ प्रचारक होते. त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंटमध्ये आपलं कौशल्य दाखवलं. राजकीय समजूतदारपणा आणि असंतुष्ट नेते, कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी शिव प्रकाश ओळखले जातात. महाराष्ट्रात तिकीट वाटपानंतर जे नेते नाराज होते, त्याचं मन वळवण्यात शिव प्रकाश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.