विधानसभा अध्यक्षपदाची नाना पटोलेंची जागा कोण घेणार? काँग्रेस नेत्यांचं लॉबिंग सुरु

नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत त्यासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. (state Assembly Speaker congress leaders)

विधानसभा अध्यक्षपदाची नाना पटोलेंची जागा कोण घेणार? काँग्रेस नेत्यांचं लॉबिंग सुरु
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 12:06 PM

मुंबई : बड्या नेत्यांनी लॉबिंगचे प्रयत्न केल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ शेवटी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. मात्र, त्यानंतर आता पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत त्यासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. (who will be the next state Assembly Speaker, congress leaders started lobbing)

‘एक व्यक्ती एक पद’चा पुरस्कार करुन नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मागणी राज्यातील काही नेत्यांनी केली. नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी केंद्रीय पातळीवर तयारीही सुरु झाली. त्यांनतर विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. ही निवड झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. याच शक्यतेला समोर ठेवून नाना पटोलेंची जागा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस सुरु आहे. त्यासाठी आपापल्या पातलीवर लॉबिंगही सुरु झालं आहे. मराठवाड्यातील आमदार सुरेश वरपुडकर यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत असे अनेक नेते विधानसभा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण?

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एच. के. पाटील यांना राज्याचे प्रभारी नेमल्यानंतर पक्षामध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यानतंर एक व्यक्ती एक पद’चा पुरस्कार करुन नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मागणी राज्यातील काही नेत्यांनी केली. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्षामध्ये फेरनिवडी करण्यात आल्या. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे आणि मुंबईच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोले यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निवडीमुळे त्यांची विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होणार आहे. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी सध्या काँग्रसेमध्ये शर्यत सुरु झाली आहे. या जागेसाठी अनेकांनी लॉबिंगही सुरु केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाड्यातील आमदार सुरेश वडपुरकर, आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची नावं विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

लॉबिंग सुरु लवकरच निर्णय होण्याची शक्यता

राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय डावपेचात अनुभवी म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी झाली होती. मात्र, त्यांच्या नावाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध झाला. त्यामुळे त्यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची मिळू शकली नाही. भविष्यात पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यांनंतर ही खुर्ची पुन्हा खाली होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

तसेच, सुरेश वडपुरकर हे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांच्याही नावाची सध्या चर्चा सुरु आहे. या दोन्ही नावांसोबतच आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचेसुद्धा नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केले असले तरी हायकमांडकूडन येणारे आदेशच निर्णायक ठरणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोलेंची निवड निश्चित?

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

(who will be the next state Assembly Speaker, congress leaders started lobbing)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.