पंढरपूर-मंगळवेढ्यातून कोण जिंकतंय? आवताडे की भालके? वाचा एक्झिट पोलचा निकाल काय?

अत्यंत चुरशीची ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, know what exit poll prediction)

पंढरपूर-मंगळवेढ्यातून कोण जिंकतंय? आवताडे की भालके? वाचा एक्झिट पोलचा निकाल काय?
bhagirath bhalke
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 3:19 PM

पंढरपूर: अत्यंत चुरशीची ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. येत्या 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचा एक्झिटपोल आला असून त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव होताना दिसत आहे. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा निसरडा विजय होताना दिसत आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, know what exit poll prediction)

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी उमेदवारी देण्यात आली. त्याला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 340889 मतदारांपैकी 225498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 66.15 टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं.

आवताडेंना 3 हजारांचं मताधिक्य?

या निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. उपलब्ध संसाधने आणि सहानूभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानूभूतीवर मात केल्याचंही या निष्कर्षात नमूद केलं आहे.

निष्कर्ष काय?

या एक्झिटपोलवर द स्ट्रेलेमा या संस्थेने काही निष्कर्षही नोंदवले आहेत. ते खालिलप्रमाणे…

पंढरपूर शहर: भाजप आणि पारिचारिक कुटुंबाने आपल्या मतांचा वाटा कायम ठेवला आहे. शिवाय समाधान आवताडे यांनी त्यांच्या सर्व संसाधनांचा वापर केला होता. यामुळेच आवताडे आणि भगीरथ भालके यांच्यातील मतांचे अंतर कमी झालेले दिसत आहे. भगीरथ भालकेंना निसटती आघाडी पंढरपूर शहराने दिली आहे.

पंढरपूर ग्रामीण: ग्रामीणमधील पारंपारिक मते राखण्यात भालके यशस्वी झालेले दिसत आहेत. कल्याणराव काळे यांच्या मागे असलेला मतदार भालकेंच्या मागे उभा राहताना दिसत नाही. आवताडे आणि भाजपच्या यंत्रणा विविध भागांपर्यंत पोहोचल्या. त्यांनी मतदारांना प्रभावित केलं. सचिन शिंदे आणि शैला गोडसे यांचा प्रभाव नगण्य आहे. भालके यांना बहुसंख्य मतदान सहानुभूतीतून झाले आहे.

मंगळवेढा शहर/ तालुका: 35 गावांमध्ये पारंपारिकरित्या भालकेकडे कल होता. आवताडे, परिचारक, पडळकर आणि मनी फॅक्टरने बहुसंख्य मतदारांवर प्रभाव टाकला आहे. शहरात सिद्धेश्वर आवताडे यांनी सुमारे 3 हजार मतदारांवर प्रभाव पाडलेला दिसतो. परिचारक यांच्या पारंपारिक मतांच्या हिश्श्यात घट झालेली दिसत आहे. शिवाय काँग्रेसचे कलंगे आणि इतर महाआघाडीच्या भागीदारांनी त्यांच्या मतांचा हिस्सा भागीरथ भालके यांच्याकडे यशस्वीरित्या वळवला. मंगळवेढा तालुक्यातून आवताडे यांना 7 ते 10 हजार मतांची निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे.

कोणत्या भागात किती टक्के मतदान

एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात 45 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 36 टक्के आणि मंगळवेढ्यात 46 टक्के असे त्यांना सरासरी 44 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात 47 टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये 43 टक्के आणि मंगळवेढ्यात 40 टक्के असे त्यांना सरासरी 42 टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी 3 टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी 4 टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी 4 टक्के मतदान होताना दिसत आहे.

परिचारक कुटुंबाचा प्रभाव

या निवडणुकीत सुधाकर परिचारक कुटुंबाचाही प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. परिचारक कुटुंबाने संपूर्ण मतदारसंघात ताकद लावून आवताडे यांचा प्रचार केला. हे संपूर्ण कुटुंबच प्रचाराच्या मैदानात उतरले होते. परिचारक कुटुंब, आवताडे आणि भाजप कार्यकर्ते यांची या निवडणुकीत चांगली केमिस्ट्री जुळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच 80 हजार मतदारांपैकी सुमारे 70 टक्के मतदार आवताडेंकडे वळताना दिसल्याचं या एक्झिटपोलमध्ये म्हटलं आहे. भाजपने परिचारक कुटुंबाकडे या प्रचाराची धुरा सोपवल्याने चित्रं पालटल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

आघाडीच्या नेत्यांचा परिणाम

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले. जयंत पाटील यांनी गावपातळीवर जाऊन प्रचार केला. त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. त्याचा 35 गावांमध्ये चांगला परिणाम झाला. त्यातच काही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने मायक्रो प्लानिंग केल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं एक्झिटपोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे.

सिद्धेश्वर आवताडे, गोडसेंची बंडखोरी

सिद्धेश्वर आवाताडे आणि शैला गोडसे यांनी केलेल्या बंडखोरीचा परिणाम या निवडणुकीत जाणवत असल्याचं म्हटलं आहे. सिद्धेश्वर आवताडे यांना जी मते मिळताना दिसत आहेत, तेवढीच समाधान आवताडे यांची लीड कमी होताना दिसत असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

सचिन शिंदेंची वातावरण निर्मिती

या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांनी लोकवर्गणीतून 33 लाख रुपये जमा केले आहेत. ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. राजू शेट्टी यांच्या सभांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला आहे. राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांशी झालेला संवाद आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांची असलेली क्रेझ याचा या निवडणुकीत परिणाम होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, know what exit poll prediction)

धनगर समाज आणि पडळकर

या मतदारसंघात 15 टक्के धनगर समाज आहे. हा मतदार भारत भालके यांच्याबाजूने होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजात जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी धनगर समाजातील पडळकरांनी क्रेझ दिसून आली. धनगर समाजातील एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील धनगर नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी हा पारंपारिक मतदार भालकेंकडे कसा येईल याचा प्रयत्न केला. भरणे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने हा मतदार भालकेंच्या मागे उभा राहताना दिसत असल्याचा निष्कर्षही यात नोंदवण्यात आला आहे. (who will win in Pandharpur Assembly by-Election?, know what exit poll prediction)

संबंधित बातम्या:

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर

‘चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना वाईट वाटू नये म्हणून आम्ही गप्प, नाहीतर…’, जयंत पाटलांचा भाजपला मोठा इशारा

चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का? अजित पवारांनी पाटलांना पुन्हा डिवचलं

(who will win in Pandharpur Assembly by-Election?, know what exit poll prediction)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.