VIDEO: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस ठाण्यात, पोलीस अधिकाऱ्यांना का घेतलं फैलावर?; वाचा, सविस्तर
ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्यरात्रीच पोलीस ठाणे गाठले. (why devendra fadnavis Flare up mumbai police?)
मुंबई: ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्यरात्रीच पोलीस ठाणे गाठले. यावेळी फडणवीस पोलिसांवर अक्षरश: भडकले होते. फडणवीस तावातावाने जाब विचारत होते, तर पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (why devendra fadnavis Flare up mumbai police?)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार पराग अळवणी आणि आमदार प्रसाद लाड हे चौघे डोकानिया यांच्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. फडणवीस अत्यंत भडकलेले होते. 1 मिनिटं 1 सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात फडणवीस यांचं उग्ररुप पाह्यला मिळत आहे. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही. पण हे योग्य नाही. मी तुम्हाला दोष देत नाही. पण तुम्ही केलेली गोष्ट योग्य नाही. ते आम्हाला (डोकानिया) रेमडेसिवीर द्यायला निघाले आहेत आणि तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. ते पत्रं देता आणि त्यांना उचलून आणता? हे बिलकूल योग्य नाही. त्यांना धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आम्ही टेप करून ठेवली आहे, असं फडणवीस पोलीस अधिकाऱ्याला म्हणत आहेत. त्यावर मला काही याची कल्पना नव्हती सर. हा काही प्लान वगैरे नाही, असं सांगत पोलीस अधिकारी फडणवीसांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
मग अटक कशी करता?
डोकानिया यांना परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता त्यांना परमिशन देण्यात आली. मग तुम्ही त्यांना अटक का केली? , असा सवाल फडणवीस आणि दरेकर यांनी या पोलिस अधिकाऱ्याला केला. त्यावर या अधिकाऱ्याकडून पुन्हा फडणवीसांची समजूत काढण्यात येत असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
म्हणून चौकशीला बोलावलं
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
नेमका प्रकार काय?
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. (why devendra fadnavis Flare up mumbai police?)
This is called leading from the front and caring for your people
Leader of Oppostion @Dev_Fadnavis fighting for supply of #REMDESIVIR as Bruck Pharma owner detained in BKC
Stop this cheap politics Maha Vasuli Aghadhi and CM @OfficeofUT from Matoshri
— Pratik Karpe (@CAPratikKarpe) April 17, 2021
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा
(why devendra fadnavis Flare up mumbai police?)