तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 गावं मतदान का करतात?

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. इथलं मतदान पार पडलंय. आता उद्या मतमोजणी होणार आहे. पण तुम्हाला माहितीये का की, तेलंगणातील निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 गावं मतदान करतात... ही गावं तेलंगणाच्या निवडणुकीत मतदान का करतात? जाणून घेऊयात...

तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 गावं मतदान का करतात?
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 8:38 AM

चंद्रपूर | 02 डिसेंबर 2023 : आपल्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. आता उद्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तेलंगणामध्ये BRS विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. अशात भाजपनेही आपले तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, तेलंगणामध्ये होत असलेल्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्रातील 14 गावांनी मतदान केलं आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? आणि या लोकांनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान का केलं? याची कारणं जाणून घेऊयात…

14 गावांचं तेलंगणा निवडणुकीसाठी मतदान

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील ही गावं आहेत. या 14 गावातील लोक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्याच्या निवडणुकीत मतदान करतात. इथल्या नागरिकांकडे दोन्ही राज्यातली मतदान कार्ड आणि आधारकार्ड आहेत. या दोन्ही राज्यात दोन्ही राज्यांच्या शाळआ आहेत. ग्रामपंचायती आहे. एवढंच नव्हे तर सरपंच देखील वेगवेगळे आहेत. चंद्रपुरातील ही 14 गावं कोमरमभिम आसिफाबादया लोकसभा मतदार संघासाठी मतदान करतात.

14 गावं कोणती?

जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मापती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पलसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावातली नागरिकांनी तेलंगणाच्या निवडणुकीत मतदान करतात.

दोन्ही राज्यात मतदान का?

त्याच दिवशी विविध संस्थांचे पोल समोर आले. जिवती तालुक्यातील या गावांना दोन्ही राज्यातील योजनांचा लाभ घेता यावा, म्हणून त्यांना हा मतदनाचा अधिकार देण्यात आला आहे. हे नागरिक दोन्हीकडच्या निवडणुकीत मतदान करतात. या 14 गावांवर दोन्ही राज्य आपला आधिकार सांगतात.

तेलंगणातील विधानसभा निवडणूक

तेलंगणा राज्यात निवडणूक होतेय. के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस विरुद्ध भाजप, काँग्रेस अशी ही लढत होत आहे. तिन्ही पक्षाकडून विजयाचा दावा केला जात आहे. अशात आता ही निवडणूक कोण जिंकणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. उद्या या ठिकाणचा निकाल समोर येईल. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.