Special Story: जे जगनमोहन रेड्डींना जमलं ते राज ठाकरेंना का जमलं नाही?; वाचा सविस्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या राज्यातील 'राज'नीतीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Special Story: जे जगनमोहन रेड्डींना जमलं ते राज ठाकरेंना का जमलं नाही?; वाचा सविस्तर
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 4:33 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या राज्यातील ‘राज’नीतीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदललेली असताना राज ठाकरे यांचा मनसे कुठे असेल? आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी सत्ता खेचून आणली. जे जगनमोहन रेड्डींना जमलं ते राज ठाकरे यांना जमेल काय?, असा सवाल केला जात आहे. (Will Raj Thackeray return to Maharashtra politics?)

राज ठाकरे-जगनमोहन रेड्डी

जगनमोहन रेड्डी हे 48 वर्षाचे आहेत. तर राज ठाकरे हे 53 वर्षाचे आहेत. म्हणजे जगनमोहन रेड्डी हे राज यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहेत. मे 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने 172 पैकी 152 जागांवर विजय मिळवला आहे. तर, त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने केवळ एक जागा जिंकली आहे. या दोन्ही नेत्यांमधील समान सूत्रं म्हणजे दोन्ही नेते तरुण आहेत आणि आपआपल्या राज्यात लोकप्रिय आहेत. दोघांच्याही सभांना प्रचंड गर्दी होते. त्यांच्या सभांची चर्चा होते. पण जगनमोहन यांना ऐकल्यानंतर गर्दीचं रुपांतर मतात होतं. तर, राज यांच्या सभेला जमणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. या दोन नेत्यांमधील आणखी एक समानधागा म्हणजे दोघेही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेले नेते आहेत. जगनमोहन रेड्डी हे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव आहेत. तर, राज ठाकरे यांना काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा वारसा आहे.

राजकारणात कोणीही संपत नसतो

राज ठाकरेंकडे अजूनही वेळ खूप आहे. ते अजूनही तरुण आहेत. राजकारणात कोणीही कधीही संपू शकत नाही. भल्याभल्यांचं कमबॅक झालं आहे. ते चांगले वक्ते आणि संघटक आहेत. त्यांनी थोडे परिश्रमपूर्वक संघटनेची बांधणी केली तर त्यांचं कमबॅक होऊ शकतं. लोकांना नेहमी पर्याय हवा असतो. इतर पक्षांच्या राजकारणाला कंटाळलेले लोकं राज ठाकरें पर्याय निवडू शकतात. जे जगनमोहन रेड्डींना जमलं ते राज यांनाही निश्चित जमू शकतं, असं ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी, शिवसेना-मनसेचा पर्याय होऊ शकतो

राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचे आणि काँग्रेस स्वबळावर लढण्याचे चिन्हं आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना मनसेला एकत्र घेऊन निवडणुकां सामोरे जाऊ शकते. शरद पवारांना राज नेहमीच जवळचे वाटत आले आहेत. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी, सेना आणि मनसे अशी युती होऊ शकते. राज ठाकरे यांचा करिश्मा महाराष्ट्रव्यापी आहे. गर्दी जमा करण्याची ताकद त्यांची आहे. लाखांची सभा घेणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत. राज हे अॅसेट आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्यासाठी शिवसेनेचं मन वळवू शकते, असंही नरेंद्र वाबळे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राची नस सापडलीय असं वाटत नाही

राज ठाकरे हे खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे. ते उत्तम कलाकार, उत्तम वक्ते आहेत. त्यांना राजकारणाची चांगली जाण आहे. परंतु, लोकांच्या बरोबर ते राहू शकले नाहीत. 2005मध्ये त्यांनी पक्ष काढला. त्यानंतर ते प्रत्येक निवडणुकीत कमी कमी होत गेले. आता तर ते कुठेच नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांचा एक आमदार असून नसल्यासारखा आहे. मुंबईतील निम्मे नगरसेवक फुटले. अशी त्यांची परिस्थिती आहे. माणूस अत्यंत हुशार आहे. पण त्यांना महाराष्ट्राची नस सापडलीय असं वाटत नाही, असं राजकीय पत्रकार अनिकेत जोशी यांनी स्पष्ट केलं.

तर राज यांना संधी

राज यांनी राजकारणात जशी पावलं टाकायला हवीत तशी अजून टाकली नाहीत. भविष्यात त्यांना संधी आहे. पण त्यांनी वारंवार धरसोडीची वृत्ती दाखवली आहे. विषय हाती घेतले आणि अर्धवट सोडले. त्यामुळे त्यांच्याबद्दलची विश्वासहार्यता कमी दिसते. हे वातावरण सुधारता आलं तर त्यांना संधी आहे, असं सांगतानाच राज यांनी काय करायचं हे ठरवलं पाहिजे. आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तीनवेळा त्यांनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट सादर करणार असल्याचं सांगितलं. अजूनपर्यंत त्यांनी ब्लू, व्हाईट, रेड कोणतीच प्रिंट दाखवलेली नाही. जे काही करायचं ते त्यांनी स्पष्टपणे मांडलं पाहिजे, तरच त्यांना पुढे जाता येईल, असंही अनिकेत जोशी यांनी सांगितलं.

राज यांच्या कमबॅकची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत ज्या पद्धताने समीकरणे होताना दिसत आहे, त्यानुसार राज ठाकरेंचं राजकारणात कमबॅक होऊ शकतं. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती केल्यास मनसेचं कमबॅक होईल. कारण राष्ट्रवादीला ज्या जागा मिळतील तिथे शिवसेनेची मतं राष्ट्रवादीला जातील याची शाश्वती नाही. ही मते मनसेकडे वळू शकतात. मात्र, महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढल्यास मनसेचं कमबॅक होणं कठिण जाईल, असं ‘नवभारत टाईम्स’चे राजकीय पत्रकार राजकुमार सिंह यांनी सांगितलं. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसेचं भविष्य काय असेल हे आताच सांगता येणं अवघड आहे. कारण विधानसभेला वेळ आहे. त्यावेळी काय राजकीय परिस्थिती निर्माण होईल हे आज सांगणं शक्य नाही. मात्र, पालिका निवडणुका नजदीक असल्याने मनसेला चांगले दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकुमार म्हणाले. (Will Raj Thackeray return to Maharashtra politics?)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, नाना पटोलेंचं रोखठोक मत, 5 वर्ष मुख्यमंत्री कोण?

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती

(Will Raj Thackeray return to Maharashtra politics?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.