Politics : शिंदे गट-मनसे ची युती होणार का? हवेतल्या गप्पा की ठरतोय प्लॅन..!

मुंबई महापालिकेत शिवसेनेला एकाकी पाडून निवडणूक लढवण्याचा निर्धार विरोधकांनी केला की काय अशी स्थिती सध्या तरी आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप-मनसे युतीवर चर्चा होत होती मात्र, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत असल्याने या दोन पक्षातच युती होण्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

Politics : शिंदे गट-मनसे ची युती होणार का? हवेतल्या गप्पा की ठरतोय प्लॅन..!
शिंदे गट आणि मनसे युतीवर दोन्ही पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:35 PM

मुंबई :  (CM Ekanth Shinde) मुंख्यमंत्री एकनाथ यांनी (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्या निवसस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. हे सर्व घडत असताना आता राज ठाकरे देखील आज रात्री मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढत आहे. शिवाय (Municipal Election) महापालिका निवडणूकांच्या तोंडावर या घडामोडी घडत असल्याने युतीची चर्चा घडत आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांचे म्हणणे काय हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

अद्याप तसा कोणताच प्रस्ताव नाही..!

गेल्या दोन दिवसांपासूनच्या घटनानंतर आता शिंदे गट आणि मनसेची युती होणार का याची उत्सुकता शिघेला पोहचली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. पण युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव ना भाजपाकडून आला आहे ना शिंदे गटाकडून. त्यामुळे यावर लक्ष न देता सध्या बाप्पांच्या दर्शन घेऊ आणि संक्रातीमध्ये तोंड गोड करु असे सूचक विधान मनसेचे संदीप देशपांडे यांनी केले आहे.

नैसर्गिक युती झाली तर फायदाच : शिंदे गट

मन जुळतं असतील आणि हिंदूत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर हे सर्व नैसर्गिक आहे. असे असले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिंदे-ठाकरे एकत्र येतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबाबत अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. ही चर्चा केवळ प्रसारमाध्यमातूनच असल्याचे शिंदे गटाचे किरण पावसकर यांनी सांगितले आहे.

म्हणून युतीचा धोका सेनेला..!

मुंबई महापालिकेत शिवसेनेला एकाकी पाडून निवडणूक लढवण्याचा निर्धार विरोधकांनी केला की काय अशी स्थिती सध्या तरी आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप-मनसे युतीवर चर्चा होत होती मात्र, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत असल्याने या दोन पक्षातच युती होण्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. शिंदे गट आणि मनसे युती झाल्यास मराठी मतांची विभागणी होणार आणि याचा फटका शिवसेनेला बसणार हे निश्चित मानले जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.