बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल

बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्याप्रमाणेच काम करत होता. एकूणच जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप उमेदवार कांचन कुल यांनी […]

बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्याप्रमाणेच काम करत होता. एकूणच जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप उमेदवार कांचन कुल यांनी व्यक्त केला.

विरोधी उमेदवार आम्हीच जिंकणार असं आत्मविश्वासाने सांगतात. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात ही विचार करण्यासारखी बाब असल्याचा टोला लगावत, आता कुठे गेला विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास असा सवालही कांचन कुल यांनी उपस्थित केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज बारामतीतील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला सिद्धेश्वराकडून कौल मिळालाय आणि जनताही आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं.

विरोधी उमेदवार विजय निश्चित असल्याचं सांगतात. त्याचवेळी शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात. त्यावरुनच विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास काय तो कळतो असंही कांचन कुल म्हणाल्या. ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. पण जनतेने पाठबळ दिल्याने आम्हीच विजयी होऊ, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीच्या जिरायत भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांचा समावेश असलेली समिती नेमून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येथील जनतेचा पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो, असंही कांचन कुल यांनी सांगितलं. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. त्यामुळे आतापासूनच आम्ही जनतेची प्रश्न समजावून घेऊन कामाला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या भागातील लोकांचे प्रश्न आम्ही समजावून घेत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.