AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | …दिसेल तिथे जाऊन चोपू, नग्नता काय असते हे दाखवू, ऊर्फी जावेदविरोधात महिला संघटना एकवटल्या, काय पावलं उचलली?

देहविक्री करणाऱ्या भगिनींना रेड लाइटसारखा एरिया दिलेला असतो. तसा एरिया हिलाही द्यावा, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

Urfi Javed | ...दिसेल तिथे जाऊन चोपू, नग्नता काय असते हे दाखवू, ऊर्फी जावेदविरोधात महिला संघटना एकवटल्या, काय पावलं उचलली?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 03, 2023 | 3:39 PM
Share

मुंबईः मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्याविरोधात महिला संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून तीव्र आक्षेप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने तिच्यावर सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून टीका केली. तसेच पोलीसांकडे तिच्याविरोधात तक्रार देखील केली आहे. आता विविध महिला संघटनांनीही उर्फी जावेदविरोधात सडेतोड भूमिका घेतली आहे. संघटनांनी महिला आयोगाला पत्र लिहिले असून तिला कपड्यांविषयी समज द्यावी, अशी मागणी केली आहे. महिला आयोगाने काहीही कारवाई केली नाही तर बिभत्स कपड्यांमध्ये उर्फी जिथे दिसेल तिथे जाऊन तिला चोपणार, असा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.

आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवतो. याद्वारे महिला सक्षमीकरणाचे, गुड टच, बॅड टच असे उपक्रम राबवतो. आम्ही समाजात जागृती करत असताना उर्फी जावेदसारखी महिला पब्लिक प्लेसमध्ये पैसे कमावण्यासाठी अश्लील कपडे घालते.

अर्ध नग्न कपडे घालते… आज तर ती फक्त नेकलेस घालून आली… भारतीय संस्कृतीचा ऱ्हास करण्याचं काम उर्फी जावेद करतेय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कारण देते… पण या पद्धतीचं स्वातंत्र्य आम्ही तिला घेऊ देणार नाही, असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.

उर्फी जावेदविरोधात महिला आयोग कारवाई करू शकतो. त्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. तिला समज द्यावी, तसेच गूगलने तिच्यावर बंदी घालावी, अशी विनंती करावी, असे पत्रही आम्ही आयोगाला दिले आहे.

उर्फी ही तरुण पिढीची आदर्श होईल का? उर्फीचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून मुलांची मानसिकता बिघडली तर अत्याचाराला बळी पडणारी सामान्य घरातील महिला असते. उर्फी अशा वेळी सुरक्षित राहील….

देहविक्री करणाऱ्या भगिनींना रेड लाइटसारखा एरिया दिलेला असतो. तसा एरिया हिलाही द्यावा, नाही तर पुढची पिढी नग्न अवस्थेत चालेल, त्यावेळेला आपले डोळे बंद करावे लागतील.. ही स्थिती टाळण्यासाठी आजच उर्फी जावेदविरोधात कारवाई करा, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवण्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतोय. चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलीसात तक्रार देखील दिली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना उर्फी जावेदने दिल्ली येथील बलात्कार प्रकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला. या प्रकरणात तुम्ही मदत केली तर जास्त योग्य ठरेल, अशा आशयाचं ट्विट तिने केलं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेद मला कुठे भेटली तर तिला थोबडवून काढेन, आणि मग ट्विट करेन. पण महाराष्ट्रात हा नंगा नाच चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.