Shiv sena Vs BJP : वरळीत पोस्टर वॉर! आधी शिंदे गटाने शिवसेनेचे पोस्ट काढले, आता युवा सेनेनं भाजपचे पोस्टर फाडले
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरळीत जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. वरळी हा शिवसेना आमदार आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. शिंदे गट आणि भाजपात वरळीत विशेष लक्ष दिलं जात आहे. या मतदारसंघात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे.
मुंबई : मुंबई शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट (Shiv sena vs Eknath Shinde Group) असं पोस्टर वॉर (Worli Poster war) सुरु आहे. या पोस्टर वॉरचा वाद आता चिघळू लागलाय. कारण शनिवारी शिवसेनेचे (Shiv sena News) पोस्टर शिंदे गटानं काढले होते. त्यानंतर आता युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर फाडले आहेत. त्यामुळे वरळीत राजकीय वातावरण अधिकच तापलंय. अंगावर आलातर तर शिंगावर घेऊ, असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे. एका बसस्टॉपवर लावण्यात आलेले पोस्टर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेत.
वरळीत पोस्टरबाजीवरुन तणाव
गणेशोत्सवात राजकीय बॅनरबाजीची स्पर्धा जोरात सुरु असल्याचं सुरुवातीपासूनच पाहायला मिळालं होतं. मात्र ही स्पर्धा आता वरळीत टोकाला पोहोचली आहे. पोस्टरवरुन सुरु असलेल्या स्पर्धेतून एकमेकांचे बॅनर उतरवणे, फाडणे, असे प्रकारही घडत असल्याचं वरळीत पाहायला मिळालंय. वरळीच्या श्रीराम मिल बेस्ट बसवर लावलेला भाजपचा बॅनर हटवण्यात आला. आधी भाजपने शिवसेनेचा बॅनर हटवल्याचा आरोप करत हा बॅनर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काढला.
राजकीय चढाओढ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरळीत जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. वरळी हा शिवसेना आमदार आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. शिंदे गट आणि भाजपकडून वरळीत विशेष लक्ष दिलं जात आहे. या मतदारसंघात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राजकीय चढाओढ पाहायला मिळालीय. वरळीत पोस्टरबाजीवरुन वातावरण चांगलंच तापलंय.
दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट-शिवसेना आमनेसामने
एकीकडे पोस्टर वॉर सुरु आहे, तर दुसरीकडे दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कातील मैदानात कुणाला सभेसाठी परवानगी मिळणार, यावरुनही आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरु करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. तर शिवाजी पार्कवर शिवसेनेला मेळावा घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचीही चर्चा रंगली आहे.