महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री, फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना : यशोमती ठाकूर

राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री, फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना : यशोमती ठाकूर
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 7:05 PM

मुंबई : राजस्थानातील राजकीय अस्थिरतेवर (Yashomati Thakur Criticize BJP) आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या (Yashomati Thakur Criticize BJP).

भाजपला घोडेबाजाराची सवय आहे. त्यांना पैशाचा उन्मात आहे. कर्नाटकात मी हे अनुभवलं आहे. हे सगळं राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री आहेत, शरद पवार आणि सोनिया गांधी आहेत, त्यामुळे राज्यात सत्ता स्थिर आहे”, असं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

“आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही”, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राजस्थानमधील गहलोत सरकार डळमळीत

मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार डळमळीत (Rajasthan Political Crisis) करण्याचे राजकारण सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीला तब्बल 107 आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे अशोक गहलोत सरकार स्थिर असल्याचं सिद्ध झालं.

उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडाने तसेच त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठीने, काँग्रेसच्या सत्तेवरील ढग काळवंडले आहेत. सचिन पायलट यांनी कालच सध्याचे भाजप नेते आणि त्यांचे काँग्रेसमधील जुने मित्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती.

राजस्थानमधील 200 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे 107, भाजप 72 तर इतर आणि अपक्ष असे एकूण 21 आमदार आहेत. इथे स्थापनेसाठी 101 जागांची आवश्यकता आहे. तो आकडा काँग्रेसने सहज पार केला आहे. काँग्रेसला अपक्षांचीही साथ आहे.

Yashomati Thakur Criticize BJP

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या जागांच्या गणिताच्या आधारे दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार, तर उर्वरित एका जागेवर भाजप उमेदवार राज्यसभेवर पोहोचू शकेल, हे निश्चित झाले होते. काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना उमेदवारी दिली, पण भाजपने मोठे डावपेच आखल्याचं चित्र आहे.

Yashomati Thakur Criticize BJP

संबंधित बातम्या :

मोदी-शाह दिल्लीत तर फडणवीस महाराष्ट्रात नवेच, ‘नया है वह’ वरुन संजय राऊतांचा पलटवार

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.