पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान
यशोमती ठाकूर यांनी एका भाषणात बोलताना हे मोठं विधान केलं आहे.
अमरावती : काँग्रेसच्या नेत्या (Congress Leader) आणि राज्याच्या महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार (Yashomati Thakur on Sharad Pawar) यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राज्यात नव्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय. एका भाषणादरम्यान, त्यांनी हे वक्तव्य केलंय. ‘पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही’ असंदेखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटलंय. अमरावतीमधील (Amravati) एका कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलं आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावेळी शरद पवारही व्यासपीठावर उपस्थित होते.
काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता राज्यात नव्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय. एका भाषणादरम्यान, त्यांनी हे वक्तव्य केलंय. ‘पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही’ असंदेखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी म्हटलंय. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावेळी शरद पवारही व्यासपीठावर उपस्थित होते.
नेमकं कुठे वक्तव्य केलं?
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57 वी पुण्यतिथी रविवारी पार पडली. अमरावतीच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचं उद्घाटन शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. तसंच श्रद्दांजलीचा कार्यक्रमही झाला. यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार, महिला आणि बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा आणि इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ : नेमकं काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
ठाकुरांच्या वक्तव्यावर ठाकरे काय म्हणणार?
या कार्यक्रमादरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद येत्या काळात उमटण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून मंत्रिमंडळात बदल होतील, अशी कुजबूज सुरु होती. यावर नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर खुद्दर शरद पवारांनी पडदा टाकला होता. मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत, असं पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.
दुसरीकडे शिवसेना नेते गृहमंत्रीपदाबाबत आग्रही असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. राज्यातील वाढत्या ईडी कारवायांवरुन आधीच राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष पेटलेला आहेत. राज्यातल दररोज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे खटके उडत आहेत. आता कोल्हापुरातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारण तापू लागलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापुरातील शिवसैनिकांशी बातचीत करताना भाजपच्या आरोपांना थेट उत्तर दिलंय. तसंच महाविकास आघाडी सोबत सरकार कणखरपणे विकासाचं राजकारण करत असल्याचंही ठणकावून सांगितलं होतं. दरम्यान, नुकताच झालेल्या शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे पडसादही राज्यभर उमटताना पाहायला मिळाले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारमधीलच एका मंत्र्यानं पवारांचं नाव घेत मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केल्यानं, राजकीय प्रतिक्रिया नेमक्या काय उमटतात, हे पाहणं महत्त्वाचंय.
संबंधित बातम्या :
‘गॅस आणि इंधनांचे दर वाढत चालले आहेत’ विमानातच काँग्रेस महिला नेत्यांचा स्मृती इराणींना सवाल
एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला