तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात हे समजून घ्या; नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. (you are governor, not CM, nawab malik slams Governor Bhagat Singh Koshyari)

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात हे समजून घ्या; नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला
Bhagat Singh Koshyari
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 2:56 PM

मुंबई: राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. (you are governor, not CM, nawab malik slams Governor Bhagat Singh Koshyari)

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील सरकारची नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

कॅबिनेटची नाराजी

हिंगोलीत विद्यापीठ नसतानाही राज्यपाल जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. तसेच परभणीत दोन तास प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. राज्य सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळा ढवळ आहे. राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे राज्याचे मुख्यसचिव राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना त्याबाबतच्या सूचना देतील, असं त्यांनी सांगितलं.

केंद्राकडे तक्रार केली होती

राज्यपाल हे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आधी राज्यपालांनी कोविड संदर्भात आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी केंद्राकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालांनी या बैठका थांबवल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी आढावा बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आपण आजही मुख्यमंत्री आहोत असं वाटतं. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. (you are governor, not CM, nawab malik slams Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या:

राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage: 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; वाचा, 12वीचा सविस्तर निकाल

तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार

(you are governor, not CM, nawab malik slams Governor Bhagat Singh Koshyari)

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.