प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थळाबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या या विधानावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रसाद लाड यांचं विधान हे बेजबाबदार वक्तव्य आहे. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. शिवरायांचा वारंवार केला जाणारा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही”, असं संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणालेत.
प्रसाद लाड हा मुर्ख माणूस आहे. भाजपा महाराजांचा अपमाना हा प्लान करून करतोय का? अवघ्या महाराष्ट्राची माफी मागा, असं संभाजीराजे म्हणालेत.
प्रसाद लाड यांचं वक्तव्य
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लवकरात लवकर हकालपट्टी करा. अन्यथा महाराष्ट्र बंदची हाक देणार, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
हर हर महादेव हा चित्रपटाचा 18 डिसेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर असणार आहे. हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाऊ नये, अशी भूमिका सध्या शिवभक्त घेताना दिसत आहेत. हर हर महादेव चित्रपट टीव्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. चित्रपट फक्त टीव्ही वर प्रदर्शित करून दाखवाचं, असा इशारा संभाजीराजेंनी झी स्टुडिओला दिलाय.