AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीतील रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह

बारामती तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण ठरलेल्या रिक्षाचालकाची प्रकृती उपचार आणि तपासणीनंतर ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे (Baramati First Corona Patient gets Discharge)

बारामतीतील रिक्षाचालक 'कोरोना'मुक्त, हिंगोलीतील पहिल्या रुग्णाचे रिपोर्टही निगेटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 1:50 PM

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका आणि हिंगोली जिल्ह्याला दिलासा देणारं वृत्त समोर आलं आहे. बारामतीतील पहिला ‘कोरोना’ रुग्ण असलेला रिक्षाचालक ‘कोरोना’मुक्त झाला आहे, तसेच हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. (Baramati First Corona Patient gets Discharge)

पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त वाढत असतानाच बारामतीमधून जीवात जीव आणणारी बातमी समोर आली आहे. रिक्षाचालकाला लागण झाल्याने बारामती तालुक्यात ‘कोरोना’चा शिरकाव झाला होता. त्याच्यावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते.

उपचार आणि तपासणीनंतर आता त्या रिक्षाचालकाची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात झाली आहे. त्यापैकी एक (संबंधित रिक्षाचालक) रुग्ण बरा झाला आहे, तर भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांवर उपचार सुरु आहेत.

न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाला पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवार 14 एप्रिलला स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या समर्थनगरमधील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. आधी भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ त्याच्या सून आणि मुलासह दोन नातींनाही कोरोनाची लागण झाली. अशातच 9 एप्रिलला या भाजीविक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. (Baramati First Corona Patient gets Discharge)

बारामतीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने बारामती पॅटर्न सुरु केला आहे. या पॅटर्नअंतर्गत नागरिकांना घरात थांबून सर्व काही अत्यावश्यक वस्तू पुरवण्यास सुरुवात झाली आहे

हिंगोलीतून गुड न्यूज

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ‘ही बाब दिलासादायक आहे. जिल्हा प्रशासन चांगली कामगिरी बजावत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यबद्दल मी ऋणी आहे’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

(Baramati First Corona Patient gets Discharge)

पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....