पुणेकरांनो शाब्बास, एवढ्या पावसातही जम्बो रुग्णालय तयार करुन दाखवलं : उद्धव ठाकरे
पुण्यातील पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात (CM Uddhav thackeray Inaugurate Pune Jumbo Covid Center) आले.
पुणे : कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. पुण्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यासह अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CM Uddhav thackeray Inaugurate Pune Jumbo Covid Center)
यावेळी उद्धव ठाकरेंनी पुणेकरांना शाबासकी दिली. “पुणेकरांनो शाब्बास…एवढा पाऊस पडत असताना तुम्ही कमी दिवसात हे हॉस्पिटल तयार करून दाखवलं. हेही संकट दूर होईल अशी आपण गणरायाला प्रार्थना करूया,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जगातील अनेक ठिकाणांचा आढाव्यानुसार कोरोनाची एक लाट संपल्यानंतर दुसरी लाट येते. त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही. पुढचा टप्पा खूप महत्वाचा आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून चार महिने आपल्याला असेच काढावे लागणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सामाजिक जागृती आणखी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. हॉस्पिटलमधील सुविधा अशाच पडून राहू नयेत, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
मंगळवारी संध्याकाळपासून रुग्णालय सुरु होणार : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी भाषणादरम्यान या रुग्णालयाबाबत माहिती दिली. “पुण्यातील या जम्बो रुग्णालयात 600 ऑक्सिजन बेड्स आणि 200 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हे रुग्णालय 19 दिवसात उभं करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळपासून हे रुग्णालय सुरु केले जाईल,” असे अजित पवार भाषणादरम्यान म्हणाले.
“धारावीचे रुग्ण कमी होणार नाही असं म्हटलं जात होतं. अनेक अडचणी आल्यात मात्र अडचणीवर मात करून हे रुग्णालय तयार झालं. दोनच जंबो रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. या हॉस्पिटलचा उपयोग सर्वाना होणार आहे,” असे अजित पवारांनी सांगितले.
“खाजगी रुग्णालयाकडून आलेली बिलं कमी केली आहेत. गणराया कोरोनाच्या लढाईत यश देईल. पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढल्याचं सिरो सर्वेमधून समोर आलं आहे. डिसेंबरमध्ये लस येणार अस केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, ती लवकर यावी,” असेही अजित पवार यावेळी म्हणाले. (CM Uddhav thackeray Inaugurate Pune Jumbo Covid Center)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करत आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurates a dedicated COVID Hospital in College of Engineering, Pune.
Watch LIVE: https://t.co/d5rZvSdjDA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 23, 2020
संबंधित बातम्या :