मुख्यमंत्र्यांचे मिशन पुणे, उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा, अजित पवारही सोबत

पुण्यात 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विभागीय आयुक्तालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे मिशन पुणे, उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा, अजित पवारही सोबत
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 12:28 PM

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार 30 जुलै) पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता पुणे शहराकडे निघतील. यावेळी पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक ते घेणार आहेत. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असतील (CM Uddhav Thackeray to visit Pune to review COVID19 condition in city)

मुख्यमंत्री सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पुण्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विभागीय आयुक्तालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी पाच वाजता मुंबईकडे निघतील.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे. मुंबईत असूनही शेजारी जिल्हा पुण्यात न आल्याने उद्धव ठाकरेंविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन होताना दिसत आहे.

हेही वाचा : चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सारवासारव

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन नीट होत आहे, मग अंमलबजावणी होताना काही अडचणी आहेत का? कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखणे आणि मृत्यूदर कमी करणे यावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रित करु शकतात. पुण्याला निधी अपुरा पडत आहे का, याविषयीही ते विचारणा करण्याची शक्यता आहे.

(CM Uddhav Thackeray may visit Pune to review COVID19 condition in city)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.