पुणे पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर आता वैद्यकीय अधिकारी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय
1 डिसेंबरला राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे.
पुणे: पदवीधर निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम राबवल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यांदाच्या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे. कारण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे.(medical officers at polling stations for Pune graduate elections)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात 1 डिसेंबरला राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेमुळे तिरंगी लढत
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
- अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
- संग्राम देशमुख (भाजप)
- रुपाली पाटील ( मनसे )
- शरद पाटील ( जनता दल )
- सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
- श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
- डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
- अभिजित बिचुकले (अपक्ष)
देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. फडणवीस सकाळी 10 वाजता औरंगाबादेत दाखल होतील. तर 11.30 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. 12 वाजता ते पदवीधरांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
संबंधित बातम्या:
पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत
पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही
medical officers at polling stations for Pune graduate elections