पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ दावेदाराची माघार
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतली आहे (Pune graduate constituency election).
पुणे : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतली आहे (Pune graduate constituency election). त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, त्यांनी अचानक माघार घेतल्यानं इतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सारंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रावादी काँग्रेसमधून अनेकजण इच्छूक आहेत. त्यात सारंग पाटील यांच्यासह अरुण लाड, माणिक पाटील, श्रीमंत कोकाटे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत आहेत. यात सारंग पाटील या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांनीच माघार घेतल्याने इतर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अरुण लाड यापूर्वी मागील निवडणुकीतही रणांगणात उतरले होते. मात्र सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मतांच्या विभाजनाचा फायदा चंद्रकांत पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे आता यावेळी देखील अरुण लाड यांचं नाव आघाडीवर आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
ही निवडणूक पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाविषयी तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाची चर्चा नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनामुळं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदार संघातून विधानसभेत गेले आहेत. त्यामुळे आता भाजपकडून पुणे पदवीधरमतदारसंघातून कुणाची वर्णी लागते हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपमधून देखील या जागेसाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची या निवडणुकीतील उमेदवारीसाठी चर्चा सुरु आहे.
यंदा राज्यात झालेला सत्ताबदल आणि महाविकासआघाडीची मोट बांधली गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. सहकाराच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार ताकद लावली आहे. त्यातच यावेळी मदतीला शिवसेना देखील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. त्यामुळे यंदा पुणे पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी सेना ही महाविकासआघाडी भाजपच्या विरोधात दिसणार आहे.
हेही वाचा :
पुणे पदवीधर निवडणूक, पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
भाजपने खरंच स्वबळावर लढून पाहावं, बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? : पंकजा मुंडे
Pune graduate constituency election